22 January 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

'ते' अटक करण्यात आलेले आमचे साधक नाहीत, सनातन संस्थेने हात वर केले

मुंबई : मागील काही दिवसांपासून नालासोपारा येथून करण्यात आलेल्या धरपकडी नंतर राज्यभर अनेक ठिकाणी एटीएस’कडून अटक सत्र सुरु झालं होतं. त्यातील अटक करण्यात आलेले सर्वजण हे सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे या सर्व प्रकरणात सनातन संस्थेने हात झटकल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मराठा आंदोलन व ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा कट होता, असे सर्व आरोपही सनातनने फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथे आढळलेली स्फोटके आणि त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हात असलेल्या आरोपींना एकामागे एक अटक झाल्यानंतर त्या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यानंतर सर्वच थरातून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुढे येत होती. त्या पार्श्वभूमीवर आज सनातन संस्थेने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

पत्रकार परिषदेत बोलताना सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितलं कि, वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही तसेच ते सनातनचे साधक सुद्धा नव्हते, तपासात सनातनचे थेटपणे नाव आलेले नाही. मराठा आंदोलन तसेच ईददरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे असे राजहंस यांनी म्हणाले. तसेच सनातनबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या येत असून, अशा बातम्या प्रसारित करणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातनकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच सनातन संस्थेने या संपूर्ण प्रकरणातून अंग काढून घेतल्याचे बोललं जात आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x