15 November 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

मोदींना खुलं पत्र, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला त्या प्रकल्पबाधित २२ गावांचाही विरोध

अहमदाबाद : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनविण्यासाठी सरदार सरोवर येथील धरणाची खूप मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक २२ गावांचे ग्रामस्थ मोदींच्या हट्टीपणावर प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे खुल्या पत्रात या गावकऱ्यांनी म्हटले आहे की ‘आज जर सरदार पटेल जिवंत असते तर मुर्तीसाठी करण्यात आलेली धरण परिसरातील तोडफोड पाहून त्यांना सुद्धा रडू कोसळले असते. इतकंच नाही तर तुम्ही मोठा गाजावाजा करत उदघाटनाला या परंतु आम्ही गावकरी तुमचे स्वागत करणार नाही, असं खणखणीत उत्तर त्या गावकऱ्यांनी खुल्या पत्रात मोदींना दिल आहे.

जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमधील नर्मदा सरोवराच्या परिसरात उभारण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं असून उद्या पंतप्रधानांच्या हस्ते या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे अनावरण सादर पटेलांच्या जयंती दिवशी होणार आहे. मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून तेथे सुद्धा ते या मुर्तीबद्दल माहिती देत आहेत. परंतु, मोदी सरकार या भव्यदिव्य पुतळा प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करुन उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे असे समजते.

परंतु या मुर्तीबद्दल तब्बल २२ प्रकल्पबाधित गावांचा आक्षेप आहे. त्यामुळे २२ गावातील संतप्त ग्रामस्थांनी पंतप्रधानांना या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे खुले पत्रच लिहिले आहे आणि सणसणीत चपराक सुद्धा दिली आहे. तसेच तुम्ही सरदार पटेलांच्या मुर्तीच्या उद्घाटनासाठी ३१ तारखेला अहमदाबादमध्ये याल तेव्हा आम्ही गावकरी तुमचे अजिबात स्वागत करणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे नको असलेल्या पाहुण्यासारखे बिनधास्त या पण आम्ही गावकरी तुमचे अजिबात स्वागत करणार नाही.’, असं गावकऱ्यांनी पत्रात ठणकावलं आहे.

तुम्ही सरदार सरोवर परिसरात असणारी जंगले, नद्या, धबधबे, जमीन आणि शेती व्यवसायावर कुऱ्हाड फिरवली आणि आमच्या जगण्याचे साधनच हिरावून घेतले आहे. दरम्यान, तुमच्या या प्रकल्पामुळे आमचं सगळं काही नष्ट करण्यात आलं आहे. आणि आता यासाठीचा सोहळा साजरा होणार असल्याबद्दल या पत्रात दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. आमच्या गावात आजही पिण्याचे पाणी, रुग्णालये, शाळा अशा प्राथमिक सुविधा आज सुद्धा उपलब्ध नाहीत. तरी सुद्धा या सुविधांसाठी सरकार पैसे का खर्च करत नाही, असा सवाल सुद्धा या हतबल गावकऱ्यांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x