18 January 2025 6:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव
x

भाजपचे ज्येष्ठ नेते व म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

रत्नागिरी : भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते व म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांवर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमीष देत तब्बल १४ वर्षे एका महिलेची शारीरिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या पीडित महिलेने अनेक वर्ष अन्यायाविरुद्ध दाद मागितली होती, परंतु त्या महिलेची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे हतबल होऊन अखेर पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने दखल घेत भाजप नेते मधु चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. २००२ ते २०१६ अशी तब्बल १४ वर्षे या पीडित महिलेचे मधू चव्हाण यांच्याकडून शोषण करण्यात येत होते अशी तिची तक्रार आहे. तिला मधु चव्हाण यांनी लग्नाचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन देऊन त्यांनी माझा गैरफायदा घेतला असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुद्धा केली होती. परंतु हा तपास अनेक वर्ष चालूच राहिला होता. परंतु पुढे संपूर्ण तपास खुंटला होता आणि अखेर कंटाळून पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या महिलेने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर चिपळूण न्यायालयाने मधु चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावर मधू चव्हाणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढताच त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चिपळूण पोलिसांना मधु चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करणे भाग पडले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३७६ आणि ४२० अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी मधू चव्हाण यांनी आरोप करणारी महिला केवळ खोट्या तक्रारी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x