नवी दिल्ली : द्वारकाचे शंकराचार्य जगदगुरु स्वरूपानंद सरस्वती हे वृंदावन येथे एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी मोदीसरकारवर सडकून टीका केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मोदींना दिलेल्या झप्पीचे खुलं समर्थन सुद्धा केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाचे कौतुक सुद्धा केले आहे. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
संसदेत राहुल गांधीनी मोदींना दिलेल्या झप्पीचे ते कौतुक करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यक्ती म्हणून विरोध नाही तर मोदी सरकारच्या धोरणाला विरोध असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी गळाभेटीतून दाखवून दिले आहे. तसेच राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्याला विरोध न करता भाजपाच्या धोरणाला विरोध केला असल्याचा टोलाही शंकराचार्यांनी भाजपाला लगावला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावर बोलताना शंकराचार्य म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला अयोध्येत राम मंदिर बांधायचे नाही, त्यांना आगामी लोकसभा निवडणूक राम मंदिराच्या जोरावर जिंकायची आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप सुद्धा शंकराचार्यांनी केला. पुढे ते म्हणजे की, सरकार येऊन सुद्धा नरेंद्र मोदी सरकार गोहत्या बंदीचा कायदा बनवू शकले नाही आणि कलम ३७० व समान नागरि कायदाही अंमलात आणू शकलेलं नाही अशी थेट टीका त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर केली आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपाच्या राम मंदिराच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणाले की, भाजपाला राम मंदिर बांधायचे नाही, आगामी लोकसभा निवडणूकीत राम मंदिराच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचा विचार आहे. राम मंदिरावर भाजपा लोकांची दिशाभूल करत आहे. मोदी सरकार गोहत्या बंदीचा कायदा बनवू शकले नाही. याशिवाय कलम 370 आणि समान नागरि कायदाही आमंलात आणला नाही.






























