11 January 2025 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

शरद पवारांची सरसंघचालक मोहन भागवतांवर कडाडून टीका.

पंढरपूर : मोहन भागवत जे बोलत आहेत त्या त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंढरपूर येथे आयोजित केलेल्या एका शेतकरी मेळाव्याला संबोधताना म्हणाले. या शेतकरी मेळाव्यात पवारांनी नीरव मोदी, संभाजी भिडे. मिलिंद एकबोटे, सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्र सरकार या सर्वांवरच आपल्या भाषणातून जोरदार हल्ला केला.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागील विधानाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, माझी केंद्र सरकार आणि भारताच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की मोहन भागवत म्हणतात त्याप्रमाणे भागवतांच सैन्य देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी काठ्या घेऊन देशाच्या सीमेवर पाठवून द्यावं म्हणजे त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांसमोर येईल.

त्यानंतर पीएनबी बँक ११,३०० कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदींवर बोलताना पवार म्हणाले की, सध्याचं सरकार या घोटाळ्याच खापर तत्कालीन यूपीए च्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्नं करत आहे. तसेच पुढे ते असेही म्हणाले की देशातील एका जवाबदार व्यक्तीने नीरव मोदी हे अशा पध्दतीने घोटाळा करीत असल्याचे लेखी स्वरूपात पंतप्रधान कार्यालयाला कळवले होते परंतु पंतप्रधान कार्यालयाने ते गंभीरपणे घेतलं नाही आणि जाणीवपूर्वक देशाची लूट करू दिली की काय अशी शंका निर्माण होते.

सत्ताधारी पक्षातले लोक हे भिडे आणि एकबोटे यांचे पाय धरण्यात धन्यता मानणारे असल्याने त्यांच्यावर कितपत कारवाई होईल याबाबत शंका आहे असे शरद पवार पुढे म्हणाले. तसेच सत्ताधाऱ्यांना राज्यस्थान, कर्नाटक आणि त्रिपुरा राज्यांत अपेक्षेप्रमाणे निकाल लागला तर लगेचच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील, अन्यथा सध्याचं सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे ही पवार पुढे म्हणाले.

आमच्या पक्षाचे प्रयत्न आहेत की सर्वच घटक पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणूक लढवावी आणि त्यासाठी आमचे दिल्लीमध्ये चर्चा सत्र सुध्दा असल्याचे शरद पवार उपस्थितांना संबोधताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x