27 January 2025 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

राज्यात युती झाल्यास शिवसेनेला मोठं नुकसान

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर भाजपला फायदा होऊन सेनेच्या मतांच्या टक्केवारीत प्रचंड घट होऊ शकते असा अंदाज सर्व्हेमधून वर्तविण्यात आला असून सेनेच्या मतांची गतवेळची टक्केवारी २४ वरून थेट १९ टक्क्यांवर म्हणजे ५ टक्क्यांनी घसरू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजपला फायदा होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या मतांची टक्केवारी २ ने वाढून त्यांना २९ टक्के मत मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आघाडी आणि युतीमध्ये सर्वाधिक मतं युतीलाच मिळतील. युतीला एकूण ४८ टक्के मतं मिळतील तर आघाडीला ४० टक्के मत पडतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

त्याचा अर्थ आघाडी आणि युती मध्ये सर्वाधिक टक्केवारी ही युतीची असेल. एबीपी न्यूज-सीएसडीएस व लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यास काय स्थिती असू शकते ते अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

हे झाले सर्व्हेमधील अंदाज पण एकूणच राज्यातली वस्तुस्थिती बघितल्यास भाजप आणि शिवसेनेमधला दुरावा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवसेनेने जरी स्वतंत्र निवडणुका लढविण्याची घोषणा केली तरी शेवटच्या क्षणी काय चित्र पालटेल हे सांगता येत नाही. तर दुसऱ्याबाजूला असं सुद्धा होऊ शकत जे २०१४ मध्ये झालं होतं. दोन्ही पक्ष निवडणुका स्वतंत्र लढवून एकमेकांवर प्रचारात चिखलफेक करतील. त्यामुळे माध्यमांचं लक्ष या दोन्ही पक्षांच्या प्रचारावर केंद्रित होईल आणि इतर महत्वाचे विषय मागे पडून याच दोन्ही पक्षांवर सर्वांचं लक्ष केंद्रित होईल.

आम्ही स्वतंत्र लढतो आहोत असं दाखवून निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र येतील जसे २०१४ मध्ये आले होते. तरी एकूणच पुढे काय होत ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी २०१४ प्रमाणे भाजप आणि शिवसेनेने वेगळे लढून राजकारण केलं तर ते त्यांच्या अंगलट सुद्धा येऊ शकत. कारण मोदींच्या सत्ताकाळात त्यांच्यावर नाराज असलेला मोठा मराठी मतदार सेनेला मतदान करण्यापेक्षा मनसेवर विश्वास ठेवणे पसंत करेल. त्याला कारण म्हणजे २०१४ प्रमाणे शिवसेना निवडणुकीनंतर पुन्हां भाजप सोबत जाऊ शकते ही भीती त्याच्या मनात असेल.

तसेच शिवसेनेचा ४-५ वर्षातील विकास शून्य कारभार पाहता मराठी मतदार पुन्हां सेनेला मतदान करण्यापेक्षा मनसेला मत देणं पसंत करतील. तो मतदार विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक आणि कोंकण मधला मराठी मतदार असेल. तसेच मनसेचा मूळ मतदार जो २०१४ मध्ये सेनेकडे वळला होता, तो पुन्हा मनसेकडे वळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x