5 November 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

हिंदुत्वाच्या नावावर असा खेळखंडोबा काँग्रेसच्या काळात सुद्धा झाला नव्हता: उद्धव ठाकरे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उफाळलेला केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेने मोदी सरकार आणि आरएसएस’वर सामनामधून बोचरी टीका केली आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर देशात सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा तर काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा झाला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामनामधून केला आहे.

आज मोदी सत्तेवर आहेत आणि राम मंदिर उभारता येत नसल्याचे खापर ते काँग्रेसवर फोडत असून यावरुन मोदींना राज्य करणे जमले नाही आणि आरएसएस’ला सुद्धा घोड्यास लगाम घालणे जमले नाही हे स्पष्ट होते’, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे. दरम्यान, अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी केंद्रात अध्यादेश काढला जाणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राममंदिर उभारणीबाबत अध्यादेश काढण्याचा विचार होईल, असे मोदींनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.

एकीकडे केरळात मंदिर आणि हिंदुत्व रक्षणासाठी आरएसएस रस्त्यावर उतरत आहे, पण अयोध्येतील राममंदिरप्रश्नी ते थंड आहेत. मोदी यांच्या कोर्टाच्या बतावणीवर ‘लोकभावना’ फेम आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोलत नाहीत व मोहन भागवत पुढे जात नाहीत’, असा चिमटा सुद्धा शिवसेनेने काढला आहे. काही दिवसांपूर्वी आरएसएस’ने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खरमरीत भाषेत टीका केली होती आणि त्याला सुद्धा शिवसेनेने आजच्या सामानामधील अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x