21 November 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

पालघर निवडणूक, एका रात्रीत ६.७२% मतं वाढली? शिवसेना

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर १२ तासात तब्बल ८२,००० मतं वाढली कशी असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केला आहे. एकुण मतांमध्ये पालघर पोटनिवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत ६.७२ टक्के इतकी मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेच्या सामना मुखपत्रातुन करण्यात आला आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी पालघरमधील लोकसभा पोटनिवडणूकचे मतदान पार पडल्यानंतर जिल्ह्यातील ६ विधानसभा क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावरून आणि बुथवरील माहिती गोळा केली. त्यादरम्यान एकूण ४६.५० टक्के ही मतदानाची आकडेवारी समोर आली. परंतु या आकडेवारीत जास्तीत जास्त १-२ टक्क्यांच्या फरक असू शकतो असं गृहीत असत.

परंतु एका रात्रीत १-२ टक्के नव्हे तर तब्बल ६ टक्के मतं कशी काय काढली? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. कारण आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सोमवारच्या प्रेसनोटमध्ये ८,०४,९५० इतक्या मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु पुन्हा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये त्यांनी हा आकडा ८, ८७, ६८७ मतदारांनी मतदान केल्याचे प्रसिद्ध केले. म्हणजे तब्बल ८२,७३७ इतक्या मोठ्या फरकाने मतदान वाढले.

एकूणच पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत आधीच घट झाल्याने सर्वच पक्षांसाठी एक एक मत हे अमूल्य ठरणार आहे. मात्र एका रात्रीत याच टक्केवारीचा चमत्काराचा आकडा तब्बल ५३.२२ इतका प्रचंड फुगला आहे. त्यामुळे सामनामध्ये ही वाढलेली मतं कोणाला तारणार यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x