प्रादेशिक पक्षात देशात सेनेला सर्वाधिक देणग्या, सर्वाधिक देणगीदार बांधकाम क्षेत्रातील
नवी दिल्ली : सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला शिवसेना पक्ष हा संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय देणग्या मिळवण्यात अव्वल ठरली असल्याचे २०१६-१७ च्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अधीकृत रित्या उघड झालेल्या देणगीदारांच्या यादीत बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आलं आहे.
शिवसेनेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून सत्तेत असल्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. कारण या देणगीदारांमध्ये सर्वाधिक संख्या ही बांधकाम व्यवसायाशी संबंधित कंपन्यांची आहे. त्यामध्ये रोमा बिल्डर्स प्रा. लि, नहार बिल्डर्स, ओंकार रिअॅल्टर, कल्पतरू प्रॉपर्टीज, पॅलाडियम कन्स्ट्रक्शन, भैरवनाथ शुगर वर्क्स लि., रुबी मिल्स अशा मंडळींचा बडय़ा देणगीदारांत समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमावली प्रमाणे देशातील सर्वच पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा ताळेबंद निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. त्या संबंधित २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदात ही बाब उघड झाली आहे.
शिवसेनेला कोणी किती देणग्या दिल्या आहेत त्याची अधिकृत आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
रोमा बिल्डर्स प्रा. लि : ५ कोटी
भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड : ४ कोटी
मॉडर्न रोड मेकर्स प्रा. लि : २ कोटी
ए. एन. इंटरप्रायजेस इन्फास्ट्रक्चर सव्र्हिस प्रा. लि : २ कोटी
कल्पतरू प्रॉपर्टीज लि : ५५ लाख
जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि : २५ लाख
पॅलाडियम कन्स्ट्रक्सन्स प्रा. लि. : ६ लाख
ओंकार रिअॅल्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स : ४ लाख
नहार बिल्डर्स : १ लाख
असे तब्बल ७१ कॉर्पोरेट देणगीदारांनी एकूण १८ कोटी ३ लाख ४ हजार ७०१ रुपयांची देणग्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी शिवसेनेला दिल्याचे पक्षाने निवडणूक आयोगा पुरविलेल्या माहितीत समोर आलं आहे.
कोर्पोरेट देणगीदारां व्यतिरिक्त वैयक्तिक देणगीदारांकडून आणि विविध संस्थांकडून शिवसेनेला तब्बल ७ कोटी ८१ लाख मिळाल्याचे सुद्धा या आकडेवारीत समोर आलं आहे. विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत मुंबई महानगर पालिकेशी संबंधित कंत्राटदार यांचा अर्थातच कॉर्पोरेट आणि वैयक्तिक व छोटय़ा व्यावसायिक देणगीदारांमध्ये समावेश दिसत आहे. देशात शिवसेने खालोखाल दिल्लीतील आप या पक्षाचा क्रमांक लागतो.
त्यामुळे शिवसेना सत्तेत आल्यानंतर वाढलेल्या महागाईने सामान्य जनतेचा खिसा जरी रिकामा होत असला तरी सत्ताधाऱ्यांचे खिसे मात्र पैशाने तुडुंब वाहताना दिसत आहेत असच ही आकडेवारी सांगते.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील