15 January 2025 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

'सामना'मधून भुजबळांचे कौतुक, ओबीसी लीडर सेनेला पक्षात हवेत का ?

मुंबई : आजच्या सामना अग्रलेखातून छगन भुजबळ यांच कौतुक करण्यात आलं असून त्यामागे ओबीसी लीडर चेहरा हे मुख्य कारण असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत. त्याबरोबरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे सुद्धा यामागे कारण असल्याची राजकीय कुजबुज सुरु आहे.

मुख्य म्हणजे अग्रलेखात महाराष्ट्र सदनचा घोटाळा झालाच नव्हता, असा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला आहे. पुढे भुजबळांच्या जामीनानंतर झालेल्या सुटके बद्दल बोलताना सामना मध्ये असं म्हटलं आहे की, आता छगन भुजबळ नवा मेकअप करून कोणत्या मंचावर उतरतात ?

उत्तर महाराष्ट्रात भुजबळांचा दबदबा असलेल्या भागात माळी आणि ओबीसी समाजात भुजबळांवर शरद पवार यांनीच अन्याय केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेने भुजबळांना सामनातून राजकीय दृष्ट्या चुचकारले आहे असं म्हटलं जात आहे. २०१९ मधील निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याच स्पष्ट केलं आहे. त्यात जर स्वतंत्र निवडणूक लढवायच्या म्हटल्यावर मुख्यमंत्री पदाचा कोणता चेहरा जनतेसमोर घेऊन जायचा हा प्रश्न शिवसेनेला पडला आहे.

तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्याने पुन्हां निवडणुकीच्या तोंडावर डोकं वर काढल्यास विरोधक सामानातून मराठा मोर्च्याची कशी खिल्ली उडवलेली याची आठवण विरोधक जाणीवपूर्वक आठवण करून देतील आणि शिवसेनेला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व आताचे ओबीसी लीडर छगन भुजबळ शिवसेनेला खरंच त्यांच्या पक्षात हवेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x