भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव : सामना
मुंबई : भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव असल्याची टीका सामना मुखपत्रातून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे आगामी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. मुस्लिम आणि बहुजन ऐक्याची हाक देत आम्ही आमची आगामी निवडणुकीत दाखवून देऊ अशी घोषणा उभयतांकडून करण्यात आली आहे.
वास्तविक हे दोन्ही पक्ष कालपर्यंत भाजपच्या सोयीचे राजकारण करत आले आहेत. मात्र २०१९ मधील निवडणुकीत हे भाजपाला उघड मदत करतील. नेमकी त्यासाठीच आंबेडकर आणि ओवेसी यांनी अभद्र युती केली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीवर सडकून टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने येत्या २ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे या युतीची भव्य सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुस्लिमांनी देशाचे नागरिक म्हणून नव्हे, तर केवळ मुस्लिम म्हणूनच जगावे यासाठी जाणीवपूर्वक डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसींनी एकत्र येऊन भाजपला पूरक असे नवे डबके तयार केले आहे. मात्र दलित व मुसलमानांनी वेळीच एकत्र येऊन ही डबकी उधळून लावायला हवी. दरम्यान, २०१९च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे’, असा थेट आरोप सुद्धा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नव्याने जन्माला आलेल्या युतीवर केला आहे.
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी सामना मुखपत्रात…
१. त्या दोघांचे एकत्र येणे हे भारताच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे.
२. एमआयएम हा मुस्लिम लीगचा भ्रष्ट अवतार आहे व मुसलमानांच्या व्होट बँकेचे राजकारण करून देशात फुटीची बीजे रोवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. ‘‘पंचवीस कोटी मुसलमान हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना दूर ठेवा, आम्ही हिंदूंच्या कत्तली करू’’ अशी कसाईछाप भाषा वापरणार्या ओवेसीशी हातमिळवणी करून प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजाला नव्या खड्ड्यात ढकलले आहे.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी अमृताचा प्याला दिला. त्यात विष कालवण्याचे काम करू नका. अर्थात कोणी कितीही मांडीवर थापा मारल्या तरी दलित समाज व राष्ट्रवादी मुसलमान हा शहाणाच आहे. नव्या अभद्र युतीकडे तो वळणार नाही. महाराष्ट्रातील दलित संघटना या सत्ताधार्यांच्या दावणीला कायम बांधलेल्या असतात व समाजापेक्षा स्वतःचेच हित ते पाहत असतात. कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला जनाधार नाही व अस्मिता नाही. जातीधर्माच्या नावाने त्यांचे चांगभले सुरूच असते. प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेले त्यातून त्यांचाच खरा चेहरा उघड झाला.
४. ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, पण म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे व राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे? पुन्हा रोटी, कपडा व मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहे? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे व आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO