15 January 2025 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
x

भारतीय जनता पक्षात बुजुर्ग नेत्यांना नव्हे तर त्यांच्या अस्थींना महत्व: उद्धव ठाकरे

मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेवरून शिवसेनेने सामना मुखपत्रातून भाजपला खडे बोल सुनावले आहेत. स्वर्गीय. अटलजींच्या अस्थिकलश यात्रेवरून उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडताना म्हटलं की, अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसत होते तर काहींनी अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला.

स्वर्गीय अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यास्पद राजकारण भाजपकडून सुरू असल्याची बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. अटल बिहारी वाजपेयी हे अजातशत्रू होते. ते भारतीय जनता पार्टी तसेच संघ परिवाराचे होते. संपूर्ण देशच त्यांचा होता आणि ते देशाचे होते. पण सध्या अटलजींच्या अस्थिकलशावरून होणार हास्यास्पद राजकारण कोणालाच शोभणारे नाही. भारतीय जनता पार्टीत बुजुर्ग नेत्यांना महत्व उरलेले नाही, परंतु त्यांच्या अस्थींना महत्व मिळत असल्याचा सणसणीत टोलाही लगावला आहे. सध्या भारतीय जनता पार्टीत लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मिळत असलेल्या वागणुकीवरही या माध्यमातून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलंय शिवसेनेने सामना’मध्ये?

नेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी वाजपेयींनी कधी द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण केले नाही. विरोधकांच्या मुंडक्या उडवण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला नाही.

माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते. आधी अंत्यसंस्कार मग त्या नेत्यांच्या अस्थिकलशांच्या उत्सवी मिरवणुका या मान्य केल्या तरी त्यांच्या विचारांचे काय?

अटलजींचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन गांभीर्याने तसेच श्रद्धेने झाले नाही. अपवाद वगळता अस्थिकलश दर्शन व प्रदर्शन म्हणजे एक राजकीय रंगतदार कार्यक्रम साजरा करावा तसाच झाला. अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले.

अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसत होते. काहींनी अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला. या सर्व प्रकारांमुळे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूने देशावर शोककळा पसरली. अटलजींचे नेतृत्व म्हणजे प्रामाणिकपणाचे शिखर होते. त्यात भेसळ नव्हती. त्यांच्या पोटात एक, तर ओठांवर दुसरे असला प्रकार नव्हता.

अटलबिहारी वाजपेयींवर देशाने पंडित नेहरूंइतकेच प्रेम केले. त्यामुळे त्यांचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन एकपक्षीय न ठेवता सर्वपक्षीय म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून व्हायला हरकत नव्हती. सर्वच राजकीय पक्षांनी अटलजींचा अस्थिकलश स्वीकारून सन्मानाने आणि श्रद्धेने विसर्जित केला असता. पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी, महाराष्ट्रात शिवसेना, ओडिशात नवीन पटनाईक, पंजाबात अकाली दल यांना सोबत घेता आले असते. यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही सामील झाले असते व अटलजींच्या लोकमान्य महानतेचे विराट दर्शन जगाला घडले असते.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x