21 February 2025 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

जळगाव | शिवसेनेचे माजी आ. कैलास पाटील आणि शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Minister Chhagan Bhujbal

जळगाव, २५ सप्टेंबर | महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते. म्हणूनच न्यायालयाने आज हा निर्णय दिलेला आहे. माझ्या विरोधात ज्यांनी चुकीचे आरोप केले, त्यांच्या बाबतीत नियती बघेलच. मी सर्व निर्मिकावर सोडून देत असतो. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मला नाहक त्रास दिला, त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जळगावात दिली आहे. जळगावात आज ओबीसी आरक्षण हक्क परिषद पार पडत आहे. या परिषदेच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ जळगावच्या दौऱ्यावर आहेत. ओबीसी परिषदेला हजेरी लावण्यापूर्वी अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते माध्यमांशी बोलत होते.

जळगाव, शिवसेनेचे माजी आ. कैलास पाटील आणि शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश – Shivsena former MLA Kailas Patil join NCP party in presence of minister Chhagan Bhujbal at Jalgaon :

छगन भुजबळ पुढे म्हणाले, अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अध्यक्ष शरद पवार हे खंबीरपणे उभे राहिले. मी निर्दोष आहे, असा त्यांना विश्वास होता म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळात मला वरचा क्रमांक मिळाला. आता न्यायालयाचा निर्णय आला असला तरी माझ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, ओबीसी आणि सर्वसामान्य जनतेचे काम आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांच्या बाबतीत नियती बघेल. जनतेच्या कोर्टात त्यांचा निर्णय होईल, असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आज शिवसेनेचे चोपडा विधानसभेचे माजी आमदार कैलास भाऊ पाटील,शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा इंदिरा ताई पाटील यांनी आपल्या समर्थकांसह अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Shivsena former MLA Kailas Patil join NCP party in presence of minister Chhagan Bhujbal at Jalgaon.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x