15 January 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

पालघर निवडणुकीत जनतेने शिवसेनेला नाकारलं

पालघर : पालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पहिल्या ३-४ फेऱ्यामध्ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती, तरी बहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप पहिल्या फेरीपासूनच अग्रस्थनी होती.

एकूणच भाजपचे उमेदवार आयत्यावेळी शिवसेनेत आणण्याची खेळी शिवसेनेवरच उलटल्याचे चित्र आहे. एकूण मतदानात शिवसेनेचा उमेदवार हा तिसऱ्या नंतर दुसऱ्या स्थानी होता. मुख्य चुरस ही भाजपचे उमेदवार विजय गावित, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यातच पाहायला मिळाली. या पराभवाने शिवसेनेत शांतता पसरली असून २०१९ च्या निवडणुकीपूर्वी सेनेविरुद्ध एक नकारात्मक संदेश गेल्याचे चित्र आहे.

सत्तेत राहून सत्तेतीलच सहकारी पक्षावर आगपाखड करून सत्ता मिळवायची आणि नंतर त्यांच्या बरोबरच सत्तेत सहभागी व्हायचे हे कदाचित मतदाराला रुचले नसावे. परंतु शिवसेना पक्ष प्रमुखांनी सुद्धा येथे मोठा जोर लावून संपूर्ण पक्ष पालघर प्रचारात उतरवला होता. परंतु मतदाराने शिवसेनेला स्पष्ट पणे नाकारले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x