23 February 2025 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

तर शिवसेनेच्या भविष्यात अडचणी वाढतील

पंढरपूर : देशभरात ईव्हीएम मशीनचा सावळा गोंधळ आणि संभ्रम पाहता पुढचा लढा हा मतपत्रिकेवरील मतदानासाठी असेल असं ते म्हणाले. देशाचं संविधान बदलणं हा भाजपचा मुख्य अजेंडा असून त्यांच्यासाठी २०१९ ची निवडणूक ही शेवटची संधी असेल त्यामुळे ते कोणत्यासुद्धा थराला जाऊ शकतात असा आरोप सुद्धा त्यांनी भाजपवर केला आहे. आजही राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकत नाहीत हे उघड दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी.

धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे ‘सत्ता संपादन’ मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकातील राजकीय स्थिती बघता जर काँग्रेसने एक पाऊल माघे घेतल्यास संपूर्ण देशात आज सुद्धा तिसरी आघाडी होऊ शकते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात सत्ता स्थापनेसाठी भाजप अजून कोणत्या पातळीला जाऊ शकते हे खरंच सांगता येणार नाही. परंतु अनेक घडामोडी घडून सुद्धा सत्तेवर येणार काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सुद्धा अस्थिरच असेल त्यामुळे पुढील ३-४ महिन्यात पुन्हा वेगळ्याच राजकीय घडामोडी घडू शकतात असं भाकीत सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी नोंदवलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x