27 April 2025 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार
x

मोदींचे २०१४ मधील सोशल मीडिया 'चाणक्या'नीतीचे तज्ज्ञ प्रशांत किशोर मातोश्रीवर

मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या यशात समाज माध्यमांच्या आधारे नियोजनबद्ध वापर करून केंद्रात भाजपची सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे राजकीय पंडित आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

दरम्यान, यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रशांत किशोर यांनी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत त्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ही केवळ सदीच्छा भेट असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले असले तरी प्रसार माध्यमांनी वेगळाच कयास बांधले आहेत. शिवसेना सध्या इतर पक्षांच्या तुलनेत समाज माध्यमांवर कमी पडत आहे, हे समाज माध्यमांचा मागोवा घेतल्यास निदर्शनास येते.

नरेंद्र मोदींचे चाणक्‍य अशी नवी ओळख प्रशांत किशोर यांना मिळाली होती. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत त्यांचे सूत जुळले नाही आणि त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची साथ सोडून, नितीश कुमार यांना साथ दिली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या प्रचार-प्रसाराची आणि समाज माध्यमांवरील धुरा हाती घेतली होती. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून, त्यांनी नितीश कुमार यांची सत्ता टिकवून ठेवली. प्रशांत किशोर हे समाज माध्यमांवरील रणनीतीचे सौदागर म्हणून ओळखले जातात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या