17 April 2025 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी

श्रीगोंदा : भारतीय जनता पक्ष व काँग्रेस-एनसीपी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. काँग्रेस-एनसीपी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे दणदणीत विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा एकूण २१०० मतांनी पराभव केला.

भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय प्राप्त केला असून, आघाडीने ८ जागांवर विजय मिळविला. आघाडीच्या संगिता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, सुनीता खेतमाळीस यांनी विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाच्या दिपाली औटी, संग्राम घोडके विजयी झाल्या आहेत. प्रभाग ७ मधून आघाडीचे निसार बेपारी आणि सोनल घोडके यांनी विजय मिळविला आहे. तसेच प्रभाग ६ मधून भारतीय जनता पक्षाच्या अशोक खेंडके, मनिषा लांडे यांनी विजय प्राप्त केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या