25 April 2025 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरने लोअर सर्किट हिट केला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर 4.05 टक्क्यांनी घसरला, आता महत्वाची अपडेट आली - NSE: NTPCGREEN IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATATECH Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये घसरगुंडी, यापूर्वी दिला 726% परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RTNPOWER Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

‘स्मार्ट सिटी’ केवळ निवडणुकीचं गाजर, अनेक ठिकाणी सुरुवातच नाही

Smart city, aurangabad, pune, nagpur, upa government, smart city development program, marathi news, digital marathi news, maharashtranama

नवी दिल्ली : स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.

योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, पुणे आणि नागपूरची निवड झाली होती. या सगळ्या शहरांत एकूण १३,२८८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वेगवेगळी विकास कामे पूर्ण केली जाणार होती; मात्र शहर विकास मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार त्यातील ५,९०६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम एक तर सुरू केले गेले आहे किंवा पूर्ण झाले आहे. हे एकूण कामांच्या जवळपास ४२ टक्के आहे, तर ५८ टक्के कामे अजून सुरू व्हायच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे शहरात सगळ्यात जास्त ३,९७५.८२ कोटी रुपयांची कामे केली जाणार होती. त्यात १,५९४.७ कोटी रुपयांचीच कामे सुरू केली गेली आहेत. वेगाने कामे करण्यात नागपूर सगळ्यात पुढे आहे. नागपूरमध्ये एकूण १८९४.३४ कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या कामांतून १,६५६.९४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत किंवा पूर्ण झाली आहेत. मंत्रालयातील दस्तावेजानुसार महाराष्ट्रातील आठ शहरांपैकी प्रत्येकाला १९६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दिले गेले आहेत. शहर विकास राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी नुकतेच संसदेत हे मान्य केले की, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शंभर शहरांसाठी २५ जानेवारीपर्यंत १,०५,००० कोटींच्या २,७४८ कामांसाठी निविदा काढण्यात आल्या. त्यातील ६२,२९५ कोटीच्या २,०३२ प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे.

महाराष्ट्रातील एकूण आठ शहरांची स्थिती (रुपये कोटींमध्ये)
शहर केंद्राचा निधी अंदाजे खर्च चालू/पूर्ण योजनांचा खर्च

  1. पिंपरी चिंचवड १९६ ११४०.८५ ३१५.९१
  2. नाशिक १९६ १५८७.५७ ८९३.०९
  3. ठाणे १९६ १५१०.८३ ६३४.३३
  4. सोलापूर १९६ १८८१.२९ ३४६.०३
  5. क. डोंबिवली १९६ ९४०.४८ २२८.४८
  6. औरंगाबाद १९६ ३५७.०२ २३७.०२
  7. पुणे १९६ ३९७५.८२ १५९४.७
  8. नागपूर १९६ १८९४.३४ १६५६.९४
    एकूण १५६८ १३२८८.२ ५९०६.५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या