6 November 2024 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

कोणतेही युद्ध सुरू नसताना सीमेवर जवान शहीद का होत आहेत? : मोहन भागवत

नागपूर : सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आरएसएस’चे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरून मोदी सरकारवर बोचरी टीका केली. तर दुसरीकडे आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शहीद होण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?’ असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.

परंतु हा प्रश्नावर ते पुढे म्हणाले ‘कारण आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे घडते’ असं भागवतांनी म्हटलं आहे. काल नागपूरमध्ये प्रहार समाज जागृती संस्था रजत जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं.

देशाच्या सीमेवर जवान शहीद होण्याच्या घटना वाढत जात असल्याचे सांगताना, त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या काळाचा सुद्धा थेट उल्लेख केला. ज्यावेळी देशाला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळत नव्हते तेव्हा स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले जात असत. परंतु, स्वातंत्र्यानंतर जर कोणत युद्ध झालं किंवा होत असेल तर सीमेवर भारतीय लष्कराचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यानंतर त्यांनी कोणतेही युद्ध सुरू नसताना सुद्धा जवान शहीद होण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x