15 January 2025 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार

नवी दिल्ली: राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.

त्यामुळे आजचा निर्णय राज्य सरकारसाठी धक्का असल्याचं मानलं जात आहे. सुप्रीम कोर्टाने काही ठराविक अटींच्या आधारे बार सुरू करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. याआधी कोर्टाने या संबंधित निकाल राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारनं डान्स बार संदर्भात केलेल्या कायद्याची माहिती सुनावणी दरम्यान कोर्टाला दिली होती. दरम्यान, राज्य सरकारच्या अटींमुळे आणि या कायद्यामुळे अनेक बेकायदा गोष्टी आणि स्त्रियांचे शोषण रोखता येत असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला. परंतु ते सर्व नियम कोर्टाने अखेर रद्द केले आहेत.

कोर्टातील सुनावणी दरम्यानचे ठळक मुद्दे;

  1. बार डान्सर्सना वेगळी टिप दिली जाऊ शकत नाही. त्यांच्यावर पैसेही उधळता येणार नाहीत.
  2. अश्लिल नृत्यावरील बंदी न्यायालयाकडून कायम
  3. बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळा ठेवण्याचा नियम रद्द
  4. डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम रद्द
  5. मुंबईत रात्री ११.३० पर्यंत डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी
  6. डान्स बारमध्ये अश्लिलला नको

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x