5 November 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

गुजरात दंगल: सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी, मोदी अडचणीत?

नवी दिल्ली : गुजरातमध्ये गोध्रा कांडानंतर मोठी जातीय दंगल उसळली होती. दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आधीच क्लिन चिट देण्यात आली होती. तसेच याच प्रकरणात प्रमुख आरोपी नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटीने दिलेली क्लिन चिट गुजरात हायकोर्टाने कायम ठेवली होती. परंतु गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध झकिया जाफरी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यानुसार मंगळवारी झकिया जाफरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती. ए. एम. खानविलकर यांच्या पीठाने १९ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, याच प्रकरणी ५ ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात हायकोर्टाने गुजरात दंगलीची पुन्हा चौकशी होणार नाही असे स्पष्ट म्हटले होते. त्यानंतर झकिया जाफरी यांनी यामागे मोठा राजकीय षडयंत्र असल्याचे कोर्टाच्या निर्दशनास आणून दिले होते. परंतु, हायकोर्टाने हे मानण्यास स्पष्ट नकार देत सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा पर्याय खुला असल्याचे म्हटले होते.

माजी दिवंगत खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया तसेच सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सिटीजन फॉर जस्टिस अँड पीसने या दंगलीमागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा थेट आरोप करत तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या क्लिन चिट याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती ज्यावर आता १९ तारखेला सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x