18 November 2024 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत भाजप, मनसे व शिवसेना असे सर्वच गट भरडले जाणार

जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने महापालिकेतील सर्वच म्हणजे ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भाजपमध्ये सर्व सूत्र गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळे त्यांच्यात सुद्धा एकनाथ खडसे यांच्या गटामुळे दुही माजण्याची चिन्ह आहेत.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडी सोबत युतीसाठी आग्रह असल्याने एकनाथ खडसे यांचा गट नाराज असल्याचे समजते. सुरेश जैन यांच्या खांदेश विकास आघाडी विरोधात या आधी लढणाऱ्या भाजपवर आता त्यांच्याच सोबत घेऊन जाण्यास गिरीश महाजन याचा गट इच्छुक असल्याने भाजपमध्ये सुद्धा फूट पडण्याची चिन्हं आहेत.

सुरेश जैन यांची खान्देश विकास आघाडी त्याच्या सोयीनुसार जिल्ह्यातील राजकारण करत असल्याने शिवसेनेचे महापालिकेत जेमतेम २ नगरसेवक आहेत, त्यांचे आणि पर्यायाने शिवसेनेचे अस्तित्व सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने कधीच संपुष्टात आणलं आहे. त्यामुळे खान्देश विकास आघाडीने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक शिवसेना सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत.

जळगाव महापालिकेची निवडणूक ही भूतकाळात केवळ सुरेश जैन आणि एकनाथ खडसे अशीच होत आली होती. परंतु स्थानिक भाजपमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या वादातून दोन गट पडले आहेत. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याने एकनाथ खडसे गटावर अन्याय होणार अशी भावना निर्माण झाली आहे. त्यात गिरीश महाजन हे सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडी सोबत युती करण्यास उत्सुक असल्याने भाजपमध्ये दोन गट पडून त्याचा फायदा खान्देश विकास आघाडीला होणार अशा शक्यतेने शिवसेना, मनसे आणि भाजप या सर्वच पक्षांचे विद्यमान नगरसेवक हळूहळू सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत सामील होतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या खान्देश विकास आघाडीचे ३२ नगरसेवक असून भाजप १५, मनसे ११, राष्ट्रवादी ११, शिवसेना २, जनक्रांती २, महानगर विकास आघाडी १ आणि अपक्ष १ असं पक्षीय संख्याबळ आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x