28 April 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट
x

भाजपाची अवस्था पाहून सुषमा स्वराजांनी लोकसभेचं मैदान सोडले : चिदंबरम

नवी दिल्ली : भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय काल इंदूर येथे जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी खोचक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांनी निवडणुकीचे मैदान सोडून दिल्याचे ट्विट केले आहे.

परंतु, त्यानंतर लगेचच केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमधून चिदंबरम यांनी सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुक सुद्धा केले आहे. त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना सुद्धा केली. ते म्हणाले, “श्रीमती सुषमा स्वराज यांनी देशाची विनम्रतेने सेवा केली आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना” असं म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)#Sushma Swaraj(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या