16 April 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

केंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अ‍ॅलर्जी - राहुल गांधी

Lockdown, Rahul Gandhi

नवी दिल्ली, १० एप्रिल: देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.

अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देशभरात 77 हजार 199 लोक बरे झाले, तर 773 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 66 हजार 760 ची वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 40 हजार 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या फेजच्या पीकपेक्षाही खूप जास्त आहे.

दुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. भारताकडून अन्य देशांना लस निर्यात होत असताना, महाराष्ट्रासह काही राज्य लसींचा पुरवठा वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहे. दरम्यान देशातील स्थिती कोरोनामुळे बिघडत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

News English Summary: The failed policies of the central government have led to a terrible second wave of corona in the country and migrant workers have been forced to return to the village once again. In addition to increasing vaccination for both the lives of the common man and the economy of the country, it is also necessary to give money into their hands. But the arrogant government is allergic to good suggestions. ” That is what Rahul Gandhi has said through a tweet.

News English Title: The arrogant Modi government is allergic to good suggestions Rahul Gandhi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या