6 November 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

....मग या सरकारवर पण गोळ्या झाडा: संजय राऊत

मुंबई : शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याने टीकेची झोड उठवली आहे. तसेच मागील ४ वर्षांत कित्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या, तर राज्यातील सरकारवर (राज्यात भाजप-सेनेचं युती सरकार आहे) सुद्धा गोळ्या झाडायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सध्या देशभर अवनी वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने सरकारला जोरदार टीका सहन करावी लागत आहे. त्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सुद्धा या प्रकरणावरून टीकास्त्र सोडले आहे. दोन दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यासाठी हैदराबादहून विशेष शूटर मागविण्यात आले होते. महाराष्ट्रात एवढे एन्काऊंटर झाले. आणि त्यात अनेक खोटेही होते. मात्र वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आले असते. परंतु, वनमंत्री मुनगंटीवारांनी ते जास्त मनावर घेतले नाही.

त्यात काल भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी सुद्धा यावर ट्विट करून आवाज उठवला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. आणि त्यांची मुलेही आहेत. त्यात शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचेही संजय राऊत प्रसार माध्यमांशी याविषयावर संवाद साधताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x