22 January 2025 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

VIDEO: शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःच शपथ मोडली

Udhav Thackeray, Shivsena, BJP Alliance

मुंबई : केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

परंतु, मागील काही दिवसांपासून शिवसेनेबद्दल अनेक नकारात्मक निवडणूकपूर्व सर्व्ह प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे वरवर दिसणारी देहबोली आतून भेदरल्यासारखी होती याचा प्रत्यय आज आला आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निवडणुकीआधी चालविचल झाल्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. कारण मागील २-३ वर्षांपासून उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल अशी घोषणा करत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा करताना शिवसैनिकांकडून जाहीरपणे हात वर करत वचन घेतलं होतं.

मात्र शिवसैनिकांकडून घेतलेल्या स्वबळाच्या जाहीर वाचनाला स्वतःच तीरांजली दिल्याने शिवसैनिक तोंडघशी पडले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून घेतलेल वचन स्वतःच पक्षाध्यक्षांनी मोडल्याने आता बोलणार तरी कोण अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आपापल्या प्रभागात कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाल्याचे शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

VIDEO : काय वाचन घेतलं होतं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडून भविष्यातील स्वबळाबाबत?

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x