22 February 2025 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

एका आठवड्यात तब्बल १८० जीआर; ह्याचा अर्थ गेल्या ५ वर्षात भाजपने झोपा काढल्या: जयंत पाटील

Jayanat Patil, NCP, BJP

मुंबई : मागील केवळ एका आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या ५ वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दांत एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकावर बोचरी टीका केली आहे. ट्विट करुन जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

जयंत पाटील म्हणतात, निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून घाईगडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार सुरु आहे. सरकारने आता आपला हा उद्योग थांबवावा. त्यांच्या सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णयही त्यांनी लक्षात ठेवावा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याचा राजकारणासाठी वापर करुन मतं मागणारे दोषीच आहेत, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षावर अद्यापही टीका सुरु असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली तरी त्यांच्यात अद्याप अनबन सुरुच असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x