15 January 2025 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

योगी यांच्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास म्हणजे प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून वापरने - अभिषेक बॅनर्जी

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ , १२ सप्टेंबर | देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच उत्तर प्रदेशात कोरोनामुळे स्थिती अत्यंत भीषण असल्याचं देखील देशाने अनुभवलं आहे. परिणामी योगी सरकारसाठी आगामी निवडणुका कठीण झाल्याचं म्हटलं जातंय.

योगी यांच्यासाठी युपीचा विकास म्हणजे प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून वापरने – Transforming Uttar Pradesh for Yogi Adityanath means stealing images from infrastructure seen in West Bengal said Abhishek Banerjee :

त्यात राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवणुकीतही भाजपाला जोरदार धक्का मिळाल्याचं पाहायला मिळालं. अगदी वाराणसी, मथुरा आणि अयोध्येतही भाजपाला धक्का मिळताना विरोधकांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सतर्क झालेल्या भाजपच्या योगी सरकारने विकासाचे धिंडोरे पिटण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यातही गोंधळल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

कारण, ज्या भाजपने काही महिन्यापूर्वी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी बंगालचे अतोनात नुकसान केल्याचं म्हटलं त्याच बंगालमधील रस्ते आणि फ्लाय-ओव्हर सध्या योगी सरकार स्वतःच्या जाहिरातीत झळकवत आहेत. विशेष म्हणजे फॅक्ट-चेक मध्ये ही पोलखोल झाली असून अनेक पत्रकारांनीही योगी सरकारच्या फसव्या जाहिराती स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

पोलखोल झाल्यावर टीएमसी’ची टीका:
दरम्यान, याच जाहिरातींवरून योगी सरकारची पोलखोल झाल्यावर टीएमसी’ने देखील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. या संदर्भात अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “योगी आदित्यनाथ यांच्यासाठी उत्तर प्रदेशाचा विकास म्हणजे ममता बॅनर्जींच्या नैत्रुत्वात तयार झालेल्या प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून ते स्वतःच्या राज्याचे असल्याचे दाखविणे आहे, हे उत्तर प्रदेशातील डबल इंजिन मॉडेल फेल झाल्याचं प्रतीक आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Transforming Uttar Pradesh for Yogi Adityanath means stealing images from infrastructure seen in West Bengal said Abhishek Banerjee.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x