28 April 2025 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

पंतप्रधान समोर असतानाच भाजप मंत्र्याचे सहकारी महिला मंत्र्यासोबत अश्लील चाळे

अगरतळाः पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच त्रिपुराच्या दौऱ्यावर गेले असताना एका कार्यक्रमादरम्यान स्वतः मोदी समोर असताना एक विचित्र प्रकार घडल्याच समोर आलं आहे. कारण, एका उदघाटन सोहळ्यावेळी त्रिपुराच्या एका मंत्र्याने सहकारी महिला मंत्र्याच्या नको तिथे हाथ लावल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. पुरुष मंत्र्याने महिला मंत्र्यासोबत स्वतः नरेंद्र मोदी समोर उपस्थित असताना केलेल्या अश्लील चाळ्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षविरोधात विरोधकांनी चांगलेच रान उठवले असून, संबंधित मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी उचलून धरली आहे.

नरेंद्र मोदींच्या हस्ते कार्यक्रमाच्या उद्घाटना वेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव आणि मंत्री मनोज कांती देब मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन होत असताना मनोज कांती देब यांनी मंत्री असेल्या एका महिला मंत्र्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि त्या प्रतिकार करू शकणार नाहीत याचा अंदाज येताच, त्या महिलेच्या नको तिथे वारंवार हात फिरवण्यास सुरुवात केली. संबंधित व्हिडिओ तसेच छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका महिला मंत्र्याला नको तिथे अश्लिल पद्धतीने हात लावल्यामुळे विरोधकांनी मंत्री मनोज कांती देब यांच्या बडतर्फ करण्याबरोबरच त्यांना बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे.

वाम मोर्चाचे संयोजक बिजन धर म्हणाले, ‘मनोज कांती देब यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व महत्त्वाच्या व्यक्तींसह सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला नको त्या ठिकाणी हाथ लावला आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून छेडछाडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. युवकांची हत्या होत आहे. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला स्पर्श केला जात आहे. यामुळे मंत्री मनोज कांती देब यांना बडतर्फ करण्याबरोबरच तत्काळ अटक करायला हवी.’

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नाबेंदू भट्टाचार्य म्हणाले, ‘भाजप मंत्र्याविरोधात नको त्या विषयावरून राजकारण केले जात आहे. त्या महिला मंत्र्याची तक्रार नसेल तर तुम्हाला काय अडचण आहे. विरोधक गलिच्छ राजकारण करत आहेत.’

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या