21 January 2025 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
x

मंत्रालयात वेटरची १३ पद आणि ७००० अर्ज, राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र

मुंबई : भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.

संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी म्हणजे ३१ डिसेंबर २०१८ मध्ये सदर पदासाठी उमेदवारांची परीक्षा पार पडली. सध्या त्याच उमेदवारांची कामावर रुजू होण्याची शेवटची प्रक्रिया सुरु आहे. अंतिम निवड झालेल्या १३ उमेदवारांपैकी ८ पुरुष तर ५ महिला उमेदवार आहेत. त्यापैकी २-३ उमेदवारांनी अजून सुद्धा अंतिम कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

धक्कदायक म्हणजे वेटर या पदासाठी निवड झालेल्या एकूण १३ उमेदवारांपैकी १२ उमेदवार हे पदवीधर आहेत तर १ उमेदवार बारावी उत्तीर्ण आहे. दुसरं म्हणजे कमीत कमी इयत्ता ४थी पास अशी शिक्षणाची अट असताना सुद्धा प्रशासनाने पदवीधरांची वेटर पदासाठी निवड केल्याने त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात येते आहे. महत्वाचं म्हणजे वेटर या पदासाठी सुद्धा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x