5 November 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

'तिहेरी तलाक'विरोधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : यापुढे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे. कारण, तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. त्यात विशेष भर म्हणजे काँग्रेसने विरोध केलेल्या ‘गुन्हेगारी’ या शब्दासह केंद्राने हा अध्यादेश काढला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक आणले नसून, केवळ राजकीय फायदा घेण्यासाठीच भाजपने हा घाट घातला आहे असा थेट आरोप काँग्रेस आरोप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केला.

यापूर्वी पावसाळी अधिवेशनात म्हणजे गेल्या महिन्यात तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत एकमत न झाल्याने या विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती. तरी हे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले होते. मुस्लिम समाजातील प्रतेनुसार तिहेरी तलाक हा पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तोंडी बोलले जाते. यामध्ये ३ वेळा तलाक असे म्हटले जाते. त्यामुळे मुस्लिम महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संघटनांनी ही प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात एक महिलेने याविरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर केंद्र सरकराने हे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला होता.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x