15 January 2025 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Shraddha Walkar Murder | शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’च्या शिकार होतात, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून समस्त सुशिक्षित मुलींचा अपमान

Shraddha Walkar

Shraddha Walkar Murder Case | केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी मुलींचं शिक्षण आणि लिव इन रिलेशन यांचा एकमेकांशी विचित्र पद्धतीने संबंध जोडला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यावर निशाणा सााधलाय.

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यानी म्हटलंय, की या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, त्या चांगल्या शिकलेल्या आहेत. ज्या मुलींना असं वाटतं की आपण आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो, ती क्षमता आपल्यात आहे, असं वाटणाऱ्या मुलींसोबत असे प्रकार घडत आहेत. लोक लिव ईन रिलेशनशिपमध्ये का राहतायत? त्यांना तसं राहायचं असेल तर त्याची नोंदही कुठेतरी घेतली गेली पाहिजे. जर अशा व्यक्तींच्या पालकांना त्याचं नात सार्वजनिक जीवनात अमान्य असेल, तर अशा जोडप्यांनी कोर्टात जाऊन लग्न करावं आणि मग एकत्र राहावं.

शिकलेल्या मुलींनी अशा प्रकारचं नातं जोडू नये. शिकलेल्या मुली आई वडिलांची मर्जी नाकारुन असा निर्णय घेत असतील तर या प्रकारांसाठी त्या स्वतः जबाबदार आहेत. शिकलेल्या मुलींनी नेमकं असं त्या का करत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे.

आशिष शेलार अडचणीत :
दरम्यान, भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या जागर मुंबईच्या अभियानाची सहावी सभा काल बोरिवलीत झाली. यावेळी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे, शरद पवारांपासून ते जावेद अख्तर यांच्यापर्यंत अनेकांना सवाल केला.

ज्या घरामध्ये तरुण मुलगी आहे ते घर आज अस्वस्थ आहे. आफताब नावाचा नराधम तिचे ३५ तुकडे करतो. तो तिचे धड कापून फ्रीजमध्ये ठेवतो. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही, पण सवाल हा आहे की, मृत्युमुखी श्रद्धा झाली पण मारणारा आफताब होता? हाच प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून उभा करणारे शबाना आझमी, मेधा पाटकर, जावेद अख्तर, शरद पवार, राहुल गांधी, मेधा पाटकर यांची बोबडी बंद पडली आहे”, अशा शब्दात शेलारांनी निशाणा साधला. मात्र आता आशिष शेलार हेच त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावरून अडचणीत सापडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union minister Kaushal Kishore controversial statement on Shraddha Walkar murder case educated girls check details on 18 November 2022.

हॅशटॅग्स

#BJP India(18)#Shraddha Walkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x