13 January 2025 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Scheme Monthly Benefits | महिलांनो, प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील, अत्यंत खास योजना, पटापट अर्ज करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: JIOFIN Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

भाजप नेते दलितांच्या घरी जाताना हॉटेलमधील जेवण, भांडी व पाणी घेऊन गेले

लखनऊ : नरेंद्र मोदींचे दलितांसोबत राहण्याचे आदेश भाजपची नेते मंडळी पाळत आहेत खरी पण त्यातून सुद्धा त्यांची अस्पृश्यता दिसून येत आहे. कारण दलितांच्या घरी जाताना आमदार स्वतःसोबत चक्क हॉटेल मधील जेवण व भांडी घेऊन जात आहे आणि पळवाट काढून दलितांना आणि स्वतःच्याच वरिष्ठ नेत्यांना मूर्ख बनवत आहेत.

सध्या देशात दलितांमध्ये भाजप विरोधी वातावरण आहे. तोच द्वेष आणि राग कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना दलित वस्त्यांमध्ये आणि घरी जाऊन काही काळ वास्तव करण्याचे आदेश दिले. पण भाजपचे नेते आणि कार्यकर्ते कशी पळवाट काढत ते समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील एका मंत्री आणि आमदाराने अशी पळवाट काढली की सर्वजण थक्क होऊन गेले आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा हे सोमवारी रात्री रजनीश कुमार या दलित व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते. ते दलित व्यक्तीच्या घरी राहायला गेले पण जाताना सोबत हॉटेलमधील जेवण आणि भांडी सुद्धा घेऊन गेले होते. रजनीश कुमार यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, मंत्री सुरेश राणा आणि भाजपाचे नेते आम्हाला न कळवताच घरी येऊन धडकले. तसेच मला घरी थांबण्यास सांगितले होते. त्यांनी रात्रीचे जेवण बाहेरून मागविले होते असं रजनीश कुमार यांनी सांगितलं.

मंत्री सुरेश राणा यांनी हॉटेल मधून मागविलेल्या जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून असं उत्तम मेनू होता. इतकंच नाही तर पिण्याचे पाणी आणि भांडी सुद्धा मंत्री महोदयांनी बाहेरून मागविली होती. सुरेश राणा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मी स्वतः हॉलमध्ये बसून रजनीश यांच्या घरात बनवलेले जेवण आवडीने खाल्ले आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु प्राप्त झालेले फोटो बरंच काही सांगून जातात.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x