23 November 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

अमेरिकेतील पत्रकार देशद्रोही, त्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता खालावली आहे: डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत अमेरिकेतील पत्रकारांवर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. अमेरिकेतील देशाप्रती होणाऱ्या नकारात्मक पत्रकारितेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतापल्याचे त्यांच्या ट्विट वरून स्पष्ट जाणवते आहे.

अमेरिकेतील माध्यमांवर सडकून टीका करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की,’अमेरिकेतील पत्रकार हे देशद्रोही आहेत, ते त्यांच्या वृत्तांकनामुळे जनतेचा जीव धोक्यात घालत आहेत, ट्रम्प विरोधी भूमिकेच्या अतिरेकामुळे प्रसारमाध्यमे आमच्या सरकारच्या कामकाजाची अंतर्गत माहिती उघड करत आहेत. त्यामुळे केवळ पत्रकारच नव्हे, तर अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. हे देशभक्तीचे लक्षण नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

पुढे त्यांनी पुन्हा एक ट्विट करत म्हटलं आहे की,’आमची अत्यंत सकारात्मक कामगिरी असताना सुद्धा, माझ्या प्रशासनाचे ९० टक्के वार्तांकन हे नकारात्मक आहे. त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता सद्यस्थितीत सर्वाधिक खालावली आहे, यात आश्चर्य नसून, मरणपंथाला लागलेल्या वृत्तपत्र उद्योगातील ट्रम्प द्वेष्ट्यांना हा महान देश विकता येणार नाही. त्यांनी लक्ष विचलित करण्याचा किंवा वास्तव झाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी माझ्या नेतृत्वाखाली देश उत्तम प्रगती करत आहे,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आवर्जून म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अमेरिकेत याचे काय पडसाद उमटतात ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x