15 January 2025 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

मोदी म्हणाले होते, योगी सरकारने यूपीतील गुन्हेगारी संपवली | पण NCRB रिपोर्टनुसार युपी गुन्हेगारीत देशात दुसरा

NCRB report

लखनऊ, १६ सप्टेंबर | उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उत्तर प्रदेश आपल्याच हाती कायम ठेवण्यासाठी भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला होता.

मोदी म्हणाले होते, योगी सरकारने यूपीतील गुन्हेगारी संपवली, पण NCRB रिपोर्ट प्रमाणे युपी गुन्हेगारीत देशात दुसरा – Uttar Pradesh is on second number in crime against women’s as per NCRB report :

विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ दिवसांपूर्वी योगी सरकारने उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी संपवल्याचे जाहीरपणे सांगितले होते. उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात हात घालून विकासाची दमदार पावले टाकत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेने विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा बिगुल वाजवला होता. अलिगडमध्ये राजा महेंद्र प्रताप राज्य विद्यापीठाची कोनशिला मोदी यांच्या हस्ते बसविण्यात आली तसेच त्यांनी उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामाची प्रशंसा केली होती.

एनसीआरबी रिपोर्ट प्रमाणे गुन्हेगारीत युपीतील स्थिती बिकट:
महिलावंरील बलात्काराच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोमधून (एनसीआरबी) समोर आली आहे. 2020 मध्ये रोज सरासरी 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहे. या वर्षात 28,046 बलात्काराच्या घटना घडल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीमधून समोर आले आहे.

गतवर्षी महिलांविरोधातील अन्यायाचे एकूण 3,71,503 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2019 मध्ये महिलांशी संबंधित 4,05,326 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2018 मध्ये महिलांशी संबंधित 3,78,236 गुन्हे नोंदविण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.

कोरोना महामारीतही बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त:
2020 मध्ये कोरोना महामारी आणि देशात टाळेबंदी सुरू होती. या काळात महिलांवरी 28,046 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. यामधील 25,498 हे पीडित हे प्रौढ तर 2,655 पीडित हे 18 वर्षांहून कमी होते. भारतीय दंडविधान कायदा कलम 376 नुसार बलात्काराच्या प्रकरणाची गुन्हा म्हणून नोंद होते. 2019 मध्ये 376 कलमानुसार 32,033 तर 2018 मध्ये 33,356 तर 2017 मध्ये 32,559 बलात्कार प्रकरणांची पोलिसांत नोंद झाली आहे.

महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये ही राज्ये आहेत आघाडीवर2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे 5310 बलात्काराची प्रकरणे एकट्या राजस्थानमध्ये घडली आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 2,769, मध्यप्रदेशमध्ये 2,339, महाराष्ट्रात 2061 तर आसाममध्ये 1,657 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. तर दिल्लीमध्ये 997 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. मात्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण कमी झालेलं नसून वाढलं असल्याचं समोर आलं आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Uttar Pradesh is on second number in crime against women’s as per NCRB report.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x