15 January 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

VIDEO | गोदी मीडियाने देशाला आर्यन खानमध्ये गुंतवलं | यूपीत भाजप कार्यकर्ते व योगी सरकारच्या अमानुष मारहाणीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू

Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers

लखनऊ, ०३ ऑक्टोबर | काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ५ शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.

Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers. Violence erupted in Uttar Pradesh’s Lakhimpur-Kheri after the farmers protesting against the state government were allegedly attacked. According to media reports, five farmers were killed and over a dozen injured in the attack :

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे.

अजय मिश्र टेनी यांच्या मूळ गावी आज उपमुख्यमंत्र्यांची सभा होती. तेथे ते उपमुख्यमंत्री जाणार होते. त्या आधीच आंदोलक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर झालेल्या हाणामारीत काही शेतकरी जखमी झाले आहेत. तर मोनू मिश्राने या शेतकऱ्यांवर गाडी चालविल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोनूच्या दोन ते तीन गाड्या पेटवून दिल्या आहेत. यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांचा होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers by BJP party workers 5 farmers killed.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x