21 April 2025 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

कणकवली | नारायण राणेंच्या हाताला रेलिंगचा करंट लागताच त्यांनी इतरांना सावध केले | राणे सुखरूप

Narayan Rane

कणकवली, २८ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीय. काल रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची ही यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. यावेळी ठिकठिकाणी राणे यांचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं जात आहे. कणकवलीमध्येही राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यावेळी एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

नारायण राणेंच्या हाताला रेलिंगचा करंट लागताच त्यांनी इतरांना सावध केले, राणे सुखरूप – Video union minister Narayan Rane faced light shock at Kankavali during Jan Ashirwad Yatra :

नारायण राणे कणकवलीमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला असलेल्या रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाराज्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर राणे तिथून निघाले. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

यावेळी नारायण राणेंनी चालताना रेलिंगचा आधार घेतला. त्यावेळी एक ठिकाणी राणेंना जोरदार करंट लागला. तेव्हा राणेंना आपला हात जोरात झटकला आणि बाजूला झाले. राणेंनी सोबत असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरांनाही त्या ठिकाणी करंट लागत असल्याचं सांगत सावध केलं आणि बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर राणेंनी संबंधितांना सूचना देत तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. दरम्यान, व्हिडीओमध्ये राणेंना जोराचा करंट लागल्याचं पाहायला मिळत आहे. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Video union minister Narayan Rane faced light shock at Kankavali during Jan Ashirwad Yatra.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या