3 December 2024 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

आम्ही निवडणुकीला एकत्र येणार का, हे आता सांगता येणार नाही: उद्धव ठाकरे

पुणे : भाजप आणि शिवसेनेमधील भांडण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नसून, ५ वर्षांनी आम्ही पुन्हा काँग्रेस-एनसीपी’सारखे एकत्र येणार किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही,’ वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेत आल्यापासून आम्ही केवळ भांडायचे म्हणून भांडत नाही आहोत आणि ते भांडण माझ्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हिताचे आहे अशी पुष्टी सुद्धा त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना जोडली.

शिवसेना पक्ष प्रमुख सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुढे बोलताना त्यांनी असं स्पष्ट व्यक्त केलं की, विद्यमान सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झालं आहे आणि शिवसैनिक म्हणून आमची भूमिका जनतेच्या सोबत राहणार आहे. समृद्धी महामार्गाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पाला दोन प्रकारचा विरोध होता,’जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अल्प मिळत होता. तसेच फळबागा व पूर्णपणे सुपीक जमीन देणार नाही, अशी भूमिका अनेकांची होती. त्यामुळे त्या ठिकाणी मार्ग बदलण्यात आला आणि अल्प मोबदला दिला जात असलेल्या ठिकाणी मोबादला वाढवून देण्यात आला.

दुसरीकडे नाणार हा विषय त्याहून वेगळा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात रिफायनरी येऊ घातली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणपट्टीतील पर्यायवरणाचा ऱ्हास होणार आहे, पण असा विध्वसंक विकास आपल्याला परवडणारा नाही. त्यामुळे येथील जनतेने तीव्र विरोध केला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्र्यांना वेळ काढायचा असेल, तर काढूद्यात; पण नाणारला हा प्रकल्प होणार नाही,’ असे सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x