3 December 2024 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

आता अजित पवार व तटकरेंचा नंबर सांगणारे सोमैया आहेत तरी कुठे ?

मुंबई : मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच अन्य आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी छगन भुजबळ यांना ‘ईडी’ कडून अटक करण्यात आलं होत. छगन भुजबळ आणि भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे काळा पैसा बाळगल्याप्रकरणी १७ जून, २०१५ रोजी मनी लाँडरिंगचे दोन गुन्हे दाखल केले होते.

त्यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील भ्रष्टाचार आणि कलिना येथील जमीन हडप करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याशिवाय छगन भुजबळ कुटुंबाच्या २८० कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या. छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ आ​णि इतर काही संशयितांच्या नऊ ठिकाणांवर ‘ईडी’ने दोनवेळा छापे घातले होते.

छगन भुजबळ कुटुंबियांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे राज्याच्या तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही ‘ईडी’चे म्हणणे आहे. छगन भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराचा तपास करणाऱ्या ‘ईडी’ला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी म्हणजे भुजबळ कुटुंबाला मिळालेली लाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सदनच्या कंत्राटदारांना प्रकल्पाचे काम देण्याच्या बदल्यात भुजबळ कुटुंबाला रोख रक्कम मिळाली असून, ती रक्कम विविध कंपन्या आणि व्यवसायात गुंतविण्यात आली असल्याचा ‘ईडी’चा संशय आहे.

त्यानंतर प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन तत्कालीन मंत्री सुनील तटकरे व अजित पवार यांनी शेतकऱ्यांची लुटमार केली असून, याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांची लवकरच चौकशी सुरू होणार आहे असं वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी केलं होत. त्यामुळे अजित पवार व सुनील तटकरे दोघांना पुढची दिवाळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासोबत आर्थररोड तुरुंगात साजरी करावी लागणार असल्याचे भाकीत खासदार किरीट सोमैया यांनी अलिबाग येथे केले.

किरीट सोमैया यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी जवळजवळ एक तास चर्चा केली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘जिल्ह्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. आजपासून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात ऑपरेशनची सुरुवात झाली आहे’, असे त्यांनी पत्रकारांना सांगितल होत.

परंतु संपूर्ण प्रकरणात वारंवार पाठपुरावा आणि पत्रकार परिषद घेऊन अनेक वक्तव्य करणारे अचानक दिसेनासे झाले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुध्दा ऐकू येत नाहीत असं राजकीय विश्लेषक बोलत आहेत. छगन भुजबळ तर तुरुंगातून बाहेर आले आणि दुसरे नेते सुद्धा बाहेरच आहेत तरी किरीट सोमैया आहेत तरी कुठे असं इतर राजकीय पक्षातील नेते विचारात आहेत. किरीट सोमैयांच्या अघोषित शांती मागचं नक्की कारण तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यांच्या शांती मागचं खरं कारण भाजपच्या मंत्र्यांची बाहेर आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि मोठ्या प्रमाणावर झालेले बँक घोटाळे, ज्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांची आणि लोकांमधून झालेली टीका ही मुख्य कारण आहेत असं राजकीय जाणकार बोलत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x