18 October 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News SBI Mutual Fund | तुमच्या मुलांसाठी खास म्युच्युअल फंड योजना, छोटी SIP देईल 13,51,267 रुपये परतावा - Marathi News
x

शरद पवार व राज ठाकरे का एकमेकांना खंजीर खुपसतील? राजकीय संदर्भ नसलेले हे कॉपी-पेस्ट व्यंगचित्रकार कोण ?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला एक राजकीय आणि वस्तुस्थितीवर आधारित संदर्भ असतो हा अनुभव आहे. त्यांनी त्या त्या परिस्थितीशी सांगड घालणारी व्यंगचित्र नेहमीच प्रसिद्ध केली आहेत. अगदी राष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे असो की त्यांचाच व्यंगचित्रकारितेचा वारसा अधिक प्रगल्भतेने पुढे घेऊन वर्तमानावर बोट ठेवण्याची नेमकी कला या दोन्ही व्यंचित्रकारांनी नेहमीच जोपासली.

परंतु व्यंगचित्राला मागील किंव्हा वर्तमानाचा काहीच संदर्भ नसताना किंव्हा चालू घडामोडींवर व वस्तुस्थितीवर आधारित परिस्थितीवर व्यंगचित्र प्रसिद्ध करण्याऐवजी, केवळ जिव्हारी लागलं म्हणून उपलब्ध असलेल्या व्यंगचित्रातील व्यक्ती बदलून आणि बाकी सर्व ‘कॉपी-पेस्ट’ करून व्यंगचित्र प्रसिद्ध करणे म्हणजे एक प्रकारे व्यंगचित्रकारितेचाच अपमान आहे.

बोलायचेच झाले तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेली व्यंगचित्र ही वर्तमानातील राजकीय घडामोडी किंव्हा संदर्भ असलेली व्यंगचित्र प्रसिद्ध केली होती. अगदी राज ठाकरेंच्या कालच्याच व्यंगचित्राचाच आधार घायचा तर, ज्यामध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची गळाभेट दाखविण्यात आली होती. त्याचा संदर्भ असा होता की, पालघर निवडणुकीत एकमेकांची उणीधुणी काढताना प्रतिस्पधींचा उल्लेख अफजखान असा केला होता. तसेच दोन्ही सत्ताधारी पक्षातील वैर आणि शिवसेनेने वारंवार दिलेल्या राजीनाम्याचा धमक्या असा संदर्भ ध्यानात घेऊन उद्धव ठाकरेंच्या खिशात राजीनामा दाखविण्यात आला. तसेच एकमेकांच्या जुन्या गोष्टी विसरत स्वागत आणि गळाभेट झाल्या. म्हणजे सर्व काही विसरून मन की बात झाली आणि त्यात अफजखानाचा खंजीर दाखविण्यात आला होता.

परंतु त्याच मूळ व्यंगचित्रात दोन्ही व्यक्तिमत्व बदलून शरद पवार आणि राज ठाकरे यांची गळाभेट दाखविण्यात आली आहे. मुळात राज ठाकरेंच्या मनसेचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा युती संदर्भातील कोणताही विषय राजकीय पटलावर नाही आणि नव्हता. तसेच शरद पवार आणि राज ठाकरे हे एकमेकांना खजिर खुपसण्याचा काय संबंध ? विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या खिशात ब्लू-प्रिंट दाखवण्यात आली आहे. ब्लू-प्रिंट खिशात कशी असेल ? आणि असली तरी ती ब्लु-प्रिंट अंमलात आणण्यासाठी राज ठाकरेंची मनसे कुठे सत्तेत आहे ?

जर शरद पवार यांची घेतलेली मुलाखत असो किंव्हा शरद पवार यांची त्यांच्या निवास्थानी राज ठाकरेंनी घेतलेली भेट हे त्यामागचं कारण असेल तर शरद पवार यांची भेट स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा नाट्याच्या वेळी घेतली होती. जरी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची ती भेट केवळ राजकीय भेट होती, असं गृहीत धरलं तरी त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा संबंध येतो कुठे ?

त्यामुळेच एकूणच व्यंगचित्रकारितेकडे ग्रेट आर.के.लक्ष्मण किंव्हा स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरें सारख्या परिपक्व व प्रगल्भ दृष्टीकोनातून, तसेच वस्तुस्थितीवर आधारित दृष्ठीकोनातून न बघितल्यास एक दिवस व्यंगचित्रकारिताच धोक्यात येईल असं ही उदाहरण पाहून वाटत. हे व्यंगचित्र शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर जरी प्रसिद्ध करण्यात आलं नसलं तरी, शिवसेना नावाच्या पेजवरून ते प्रसिद्ध करून केवळ वायरल करता यावं इतकाच उद्देश दिसत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x