13 January 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा
x

अमित शहा मुंबईत बैठक घेऊन गेले, त्यानंतर महागाई, बेरोजगारीचे मुद्दे सोडून भाजपचे नेते याकूब मेमनच्या कबरीच्या मुद्द्यावर केंद्रित

Yakub Memon Grave

Yakub Memon | याकूब मेमनच्या कबऱीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत याकूब मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसंच त्या कबरीला मार्बल लावण्यात आलं आहे असं दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान या ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांना याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात याकूब मेमनचं पार्थिव दफन करण्यात आलं.

आदित्य ठाकरेंचा प्रश्न :
याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण केलं जाणं हे कितपत योग्य आहे? जेव्हा याकूब मेमनला फाशी देण्यात आली तेव्हा त्याचा मृतदेह कुटुंबाला का देण्यात आला? तेव्हा सरकार कुणाचं होतं? याकूब मेमनच्या मृतदेहावर मान-सन्मानात अंत्यसंस्कार का झाले? हे प्रश्नही उपस्थित होतात असं आदित्य ठाकरे यांनी विचारलं आहे. एवढंच नाही तर ओसामा बिन लादेनच्या मृतदेहासारखा याकूबचा मृतदेह समुद्रात का दफन केला नाही? मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने हे आरोप होत आहेत. असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपने ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. भाजपने केलेल्या आरोपांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपला मुळातच महागाई,बेरोजगारी हे मुद्दे सोडून याकूब मेमनच्या विषयावर राजकारण करायचं आहे असा पलटवार केलाय.. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण टोकाला पोचलं आहे.

याकूब मेमनच्या कबरीच्या प्रकरणानंतर आता यासंदर्भातील अनेक मुद्देही चर्चेत आले आहेत. दहशतवादी प्रकरणात पकडलेल्या अतिरेक्यांना फाशीनंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला जातो याकूब मेमनच्या प्रकरणातही तसंच झालं होतं. मात्र भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरूच्या फाशीनंतर त्याचा मृतदेह मात्र कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला नव्हता. नेमकं असं का घडलं?

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yakub Memon Grave Politics focused by BJP leaders check details 08 September 2022.

हॅशटॅग्स

#Yakub Memon Grave(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x