22 January 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

उद्या येडियुरप्पांचा शपथ विधी ? मग जेडीएस व काँग्रेसच काय ?

कर्नाटक : कर्नाटकात सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा उद्या सकाळी ९.३० वाजता शपथ विधी होणार आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. तशी अधिकृत जागा, तारीख व वेळ कळविण्यास राज्यपाल कार्यालयाने भाजकडे पत्राद्वारे विचारणा केली होती.

त्यानुसार उद्या सकाळी ९ वाजता येडियुरप्पा राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं अधिकृत ट्वीट भाजपने केलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी तब्बल १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

काँग्रेस आणि जेडीएसने गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये झालेल्या सत्तास्थापनेच्या धर्तीवर झालेल्या निर्णयांच्या आधारे बहुमताचा आकडा असलेल्या पक्षांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं जावं अशी मागणी केली होती त्याला अक्षरशा दुर्लक्षित करण्यात आल्याचे चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x