14 January 2025 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Bank FD Vs Post Office Scheme | बँक FD पेक्षा अधिक व्याज देत आहेत या पोस्ट ऑफिसच्या योजना, अधिक परतावा मिळवा

Bank FD Vs Post Office Scheme

Bank FD Vs Post Office Scheme | गुंतवणूक कोणतीही असो भारतातील कोणताही नागरिक ज्या ठिकाणाहून जास्तीचे व्याजदर आणि छप्परफाड परतावा जिथून मिळतो अशा ठिकाणी पैसे गुंतवणे फायद्याचे मानतो. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामधून तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीसह छप्परफाड परतावा मिळवू शकता.

पोस्टाच्या योजना 8.2% दरासह अनेक सुविधा देतात. त्याचबरोबर सेक्शन 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील अनुभवता येतो. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या काही खास 5 योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या फिक्स्ड डिपॉझिट पेक्षाही जास्त व्याज देतात. चला तर जाणून घेऊया.

1) महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट :
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेला महिला बचत प्रमाणपत्र या नावाने देखील ओळखले जातात. ही योजना सरकारने पोस्टाच्या माध्यमातून महिलांना कमीत कमी गुंतवणूक करून लाखोंचा फंड तयार करण्यासाठी त्याचबरोबर स्त्री शक्ती करण्यासाठी राबविण्यात येणारी ही योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला कर सवलतीसह 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जाते. त्यानंतर जेव्हा तुम्ही महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना बंद करता त्यावेळी संपूर्ण पेमेंट केले जाते.

2) नॅशनल सेविंग सर्टिफिकेट :
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या योजनेला राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या नावाने देखील ओळखलं जातं. या योजनेमध्ये तुम्ही संयुक्त त्याचबरोबर एकल खातं देखील उघडू शकता. आपली जमापुंजी वायफळ कारणांसाठी खर्च करण्यापेक्षा नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवल्यानंतर तुम्हाला याचा चांगला परतावा मिळेल. असं केल्याने तुमचं भविष्य धोक्यात येणार नाही. त्या योजनेमध्ये तुम्हाला 7.7% व्याज दराने वार्षिक चक्रवृद्धीनुसार व्याज प्रदान केले जाते.

3) मंथली इनकम स्कीम :
मंथली इनकम स्कीम ज्याला पोस्टाची मासिक आय योजना या नावाने ओळखलं जातं. या योजनेमध्ये एकल खातं उघडणारा व्यक्ती 1,500 रुपये ते जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही जॉइंट अकाउंट खोलत असाल तर, तुम्हाला 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेमध्ये 7.4% नी व्याजदर ठरते त्याचबरोबर कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळत नाही.

4) किसान विकास पत्र :
किसान प्रमाणपत्र ही योजना विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार केली गेलेली योजना आहे. बचत प्रमाणपत्राप्रमाणे ही योजना देखील सुरक्षित गुंतवणूक आणि शंभर टक्के परताव्याची हमी देते. परंतु या योजनेतून तुम्हाला कर सवलतीचा फायदा अनुभवायला मिळत नाही. दरम्यान योजनेमध्ये 7.5% व्याजदराने वार्षिक चक्रवाढ व्याजदर घेतले जाते.

5) सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या योजनेला वरिष्ठ नागरिक बचत योजना असं देखील म्हटलं जातं. यामध्ये भारतात राहणारा कोणताही नागरिक एक रकमी पैशांची गुंतवणूक अगदी सहजरित्या करू शकतो. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा फायदा देखील मिळवता येऊ शकतो आणि योग्य व्याजदर देखील मिळवता येतो. या योजनेमध्ये सध्याच्या घडीला 8.2% प्रतिवर्ष व्याजदर दिले जात आहे. जास्तीचे व्याजदर दिल्यामुळे नागरिकांना पोस्ट ऑफिस योजनेत आपले पैसे गुंतवण्यात कोणतीही शंका किंवा अडचण निर्माण होत नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank FD Vs Post Office Scheme 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank FD Vs Post Office Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x