Government Scheme | झिरो रिस्कवर हे खाते उघडा, मिळवा दरमहा 4950 रुपये हमी परतावा, सर्व फायदे बघा तर...

Government Scheme | बाजारात अस्थिरतेचे वाटेवर असताना अशा जोखमीमध्ये गुंतवणूक करून परतावा मिळवणे अवघड आहे. गुंतवणुक करताना असा पर्याय निवडला पाहिजे आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि त्यातून आपल्याला खात्रीशीर परतावाही कमवता येईल. पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम ही अशीच एक सुपरहिट अल्प बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून हमखास परतावा मिळू शकतो. MIS स्कीममध्ये मॅच्युरिटी कालावधी 5 वर्ष असतो. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला दर महा हमखास उत्पन्नाची हमी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या योजनेची माहिती सविस्तर
संयुक्त खात्यात कमाल गुंतवणूक :
PO-MIS योजनेत तुम्ही एकल आणि संयुक्त अशा दोन्ही प्रकारचे खाते उघडुन गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणुक सुरू करता येते. एका खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. त्याच वेळी, संयुक्त खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
MIS योजनेत गुंतवणुकीचे फायदे :
* पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत दोन किंवा तीन व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडून गुंतवणूक करू शकतात.
* संयुक्त खात्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदामध्ये समान पद्धतीने वाटप केले जाते.
* गुंतवणूकदार संयुक्त खाते हवे तेव्हा एकल खात्यात रूपांतरित करू शकतो.
* गुंतवणूकदार एकल खाते हवे तेव्हा संयुक्त खात्यात रूपांतरित करू शकतो.
* MIS योजना खात्यात बदल करण्यासाठी सर्व खाते धारकांना एक संयुक्त अर्ज करावा लागेल.
* योजनेची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, म्हणजे पाच वर्षानंतर तुम्ही कालावधी आणखी 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.
* एमआयएस खात्यात तुम्ही तुमच्या एका कुटुंबीयाचे नाव वारस म्हणून लावू शकता.
* या योजनेत गुंतवलेले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि यावर भारत सरकारची सार्वभौम हमी दिलेली असते.
सध्याचे व्याजदर :
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक 6.6 टक्के व्याज परतावा दिला जातो. हा व्याज परतावा दर महिन्याला खात्यात जमा केला जातो. कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडून गुंतवणूक करण्यास पात्र आहे.
योजना थांबण्यासाठी विशेष नियम :
पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे, किंवा तुम्ही योजना मुदतपूर्व बंद करू शकता. आपण गुंतवणूक सुरू केल्यावर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढू शकता. या योजनेच्या नियमांनुसार, ‘एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेतील 2 टक्के रक्कम दंड म्हणून कपात केली जाते. तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 वर्षांच्या मुदतीपूर्वी पैसे काढल्यास तुमच्या ठेव रकमेतील 1 टक्के रक्कम दंड म्हणून कपात केली जाईल.
MIS खाते कसे उघडायचे प्रक्रिया :
* एमआयएस योजने अंतर्गत खाते सुरू करण्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असायला हवे.
* ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
* 2 लेटेस्ट पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतात.
* सरकारने जारी केलेले एखादे ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल रहिवाशी पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध मानले जाते.
* हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेमध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजनेचा अर्ज भरू शकता.
* अर्ज ऑनलाइनही उपलब्ध आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता.
* फॉर्म नीट भरा आणि त्यात नॉमिनीचे नाव नमूद करा
* हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे खात्यात भरावे लागतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Government Scheme named Post office Monthly income scheme for investment and earning huge Return on 12 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL