Investment Tips | बँके पेक्षा पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला अधिक परतावा मिळेल | गुंतवणुकीसाठी सुरक्षित
Investment Tips | सामान्य गुंतवणूकदार हा नेहमीच सुरक्षित आणि अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा शोध घेत असतो. परंतु अनेकदा असं होतं की त्याला या योजनांची पूर्ण माहिती नसल्याने अनेकदा गुंतवणुकीवर नुकसान सहन करावे लागत. त्यासाठीच आम्ही तुम्हाला अशा एका गुंतवणुक योजनेची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बँकेच्या तुलनेत अधिक परतावा मिळेल.
ही योजना आहे पोस्ट ऑफिस संबंधित :
पोस्ट ऑफिस मधील गुंतवणुक ही सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या योजनांना आणि त्यावर मिळणाऱ्या परताव्यावर थेट केंद्र सरकारची हमी असते. त्यामुळे आज आपण अशाच एका उत्तम योजने बद्दल बोलणार आहोत. ही योजना आहे भारतीय किसान विकास पत्र.
किसान विकास पत्र आणि व्याजदर :
किसान विकास पत्र योजनेवर साध्या 6.9 टक्के इतकं व्याज दिलं जातं. व्याजाचा हा दर वार्षिक आधारावर गणला जातो. हा व्याजदर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा नेहमीच अधिक आहे. विशेष म्हणजे या व्याजदरात भारत सरकारने मागील दोन वर्षात कोणतेही बदल केले नाहीत. या योजनेत तुम्ही तुमची एकूण गुंतवणूक दहा वर्षांमध्ये दुप्पट करू शकता.
कमीत-कमी गुंतवणुक :
किसान विकास पत्र योजनेत किमान गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हवी तेवढी रक्कम या योजनेमध्ये गुंतवू शकता आणि त्यानंतर शंभरच्या पर्टीत ती रक्कम कितीही प्रमाणात वाढवू शकता.
हे खाते कोणाला उघडता येते :
किसान विकास पत्र मध्ये भारताचा कोणताही प्रौढ नागरिक खाते उघडू शकतो. कुटुंबातील दोन किंवा अधिक व्यक्ती सुद्धा जॉइंट खाते उघडू शकतात. कुटुंबातील मुलांचे वय दहा वर्षांपेक्षा अधिक असल्यास त्यांच्या नावे हे खाते उघडता येते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Investment Tips on post office scheme check details here 06 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय