22 February 2025 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Post Office FD Interest Rate | पोस्टाच्या FD मध्ये 2 लाखांच्या रकमेवर 1 ते 5 वर्षांत किती परतावा मिळेल, रक्कम जाणून घ्या

Post Office FD Interest Rate

Post Office FD Interest Rate | गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा प्लॅटफॉर्म अत्यंत सुरक्षित आणि फायद्याचा आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर नोकरदार व्यक्ती पोस्टाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.

अशातच पोस्टाच्या एफडीत पैसे गुंतवून प्रचंड नफा मिळवता येऊ शकतो. दरम्यान या एकडीची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये 2 लाखांची गुंतवणूक 1 ते 5 वर्षांसाठी करू शकता. पोस्टाच्या एफडी योजनेमध्ये 6.9% ते 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जाते. आज आपण तुम्हाला व्याजदरानुसार पोस्टाच्या एफडीतून 1, 2, 3, 5 वर्षापर्यंत किती रक्कम जमा करता येईल हे पाहणार आहोत.

पोस्टाच्या एफडीत 1 वर्षाने किती परतावा मिळेल :
पोस्टाच्या एफडीमध्ये तुम्ही 2 लाखांची रक्कम एका वर्षासाठी गुंतवत असाल तर, 6.9% व्याजदर आणि तुम्हाला 14,161 एवढी व्याजाची रक्कम मिळेल. म्हणजेचं संपूर्ण रक्कम दोन लाख 14 हजार 161 रुपये मिळतील.

पोस्टाच्या एफडीत 2 वर्षाने किती परतावा मिळेल :
तुम्ही पोस्टाच्या एफडीमध्ये 2 वर्षांसाठी 2 लाखांची रक्कम गुंतवत असाल तर, 7% दराने व्याजाची रक्कम 29,776 रुपये मिळतील. याचाच अर्थ मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 2,29,776 रुपये एवढी असेल.

पोस्टाच्या एफडीत 3 वर्षानंतर किती परतावा मिळेल :
एखाद्या व्यक्तीने पोस्टाच्या एफडीमध्ये 3 वर्षांकरिता 2 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असेल तर 7.1% व्याजदरानुसार 47,015 एवढे पैसे व्याजाचे मिळतील आणि मॅच्युरिटीवर मिळणारी पूर्ण रक्कम 2,47,015 असेल.

पोस्टाच्या एफडीत एकूण 5 वर्षानंतर किती परतावा मिळेल :
एखाद्या व्यक्तीने पोस्टाची 5 वर्षांसाठीची एफडी काढली असेल आणि एफडीमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली असेल तर, 7.5% व्याजदराने 89,900 एवढी रक्कम व्याजाची मिळेल. त्याचबरोबर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2,89,900 एवढी रक्कम खात्यात जमा होईल.

अशा पद्धतीने एफडीत टॅक्स वाचवता येईल :
तुम्ही पोस्टाच्या एफडीत किंवा इतर कोणत्याही एफडी योजनेत पैसे गुंतवत असाल तर, तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. यासाठी 1,50,000 लाखांची रक्कम गुंतवावी लागेल तरच तुम्हाला टॅक्स सूट मिळेल. दरम्यान तुम्हाला आणखीन टॅक्स सूट हवं असेल तर, पोस्टाच्या एफडीपेक्षा पीपीएफमध्ये गुंतवणूक सुरू करा. परंतु यामध्ये तुम्हाला 15 वर्षांपर्यंत सातत्याने गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office FD Interest Rate 27 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post Office FD Interest Rate(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x