19 November 2024 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Post Office FD | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत बक्कळ परताव्या सोबत आयकर सवलत ही मिळते, स्कीम डिटेल्स पहा

Post Office FD

Post Office FD | इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे राबवली जाणारी मुदत ठेव योजना आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस व्याज परतावा कमावून देते. या योजनेत गुंतवणूकदाराला जमा केलेल्या पैशावर व्याज परतावा मिळतो. बँकेप्रमाणेच इंडिया पोस्ट ऑफिस देखील आपल्या गुंतवणूकदारांना एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीसाठी मुदत ठेव योजनेत गुंतवणुक करण्याची सुविधा देते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेला “टाइम डिपॉझिट स्कीम” असेही म्हणतात. इंडिया पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये विविध कालावधीसाठी वेगवेगळया दराने व्याज परतावा दिला जातो.

पोस्ट ऑफीस FD:
अलीकडेच सरकारने इंडिया पोस्ट ऑफीसच्या टाइम डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. याचा गुंतवणूकदाराना चांगला फायदा होईल. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदाराला वार्षिक 6.7 टक्के व्याज दिला जातो. या योजनेचा खास फायदा असा की, गुंतवणूकदाराला अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते.

गुंतवणुकीची पात्रता :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत केवळ भारतीय नागरिक खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. एवढेच नाही तर 3 प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन एक संयुक्त कहते देखील उघडू शकतात. पालक आपल्या 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने टाइम डिपॉझिट खाते उघडून त्यात पैसे कम करु शकतात. तुम्ही या योजना खात्यात किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.

6.7 टक्के व्याज परतावा : (Post Office FD Interest Rates)
इंडिया पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणुक करण्यासाठी विविध कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या दराने व्याज परतावा दिला जातो. जर तुम्ही या योजनेत 5 वर्ष कालावधी साठी पैसे जमा केले तर तुम्हाला वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज परतावा मिळेल. तीन वर्षाच्या कालावधीसाठी 5.8 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. तर 2 वर्षांच्या मुदत ठेवीवर फक्त 5.7 टक्के व्याज परतावा दिला जातो. एका वर्षाच्या ठेवीवर सर्वात कमी म्हणजे 5.5 टक्के व्याज परतावा दिला जातो.

गुंतवणुकीवर कर सवलत :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास मिळणारा व्याज परतावा आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत करमुक्त राहील. तथापि, यापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आय भरावा लागेल. कमी कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास आयकर सवलतीचा लाभ मिळणार नाही. मुदत ठेव योजनेत कालावधी पूर्ण होण्याआधी पैसे काढता येतात, परंतु त्यावर तुम्हाला काही प्रमाणत दंड आकारला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office FD Scheme interest rates check details on 29 December 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x