19 November 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Post Office Scheme | मस्तच योजना! या योजनेत दरमहा 1500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखोंचा परतावा, योजनेचे फायदे पहा

Post office scheme

Post Office Scheme | आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत लोकांचे गरजा वाढत चालल्या आहेत, मात्र उत्पन्नात जास्त वाढ झालेली नाही. आपल्या सर्वांना आनंदी जीवन जगण्याचा मोह असतो. दर्जेदार आनंदी जीवनमान व्यतीत करणे हे माध्यमं उत्पन्न गटातील व्यक्तीसाठी थोडे खर्चिक असू शकते. यासाठी आपण काळजीपूर्वक आर्थिक नियोजन केले पाहिजे.

आर्थिक समतोल राखणे काळाची गरज बनली आहे. केवळ पॉश शहरांमध्येच नाही तर लहान शहरांमध्येही लोकांचे जीवनमान उंचावत चालेले आहे. आपल्या पैकी बरेच लोक बेस्ट ठिकाणी गुंतवणूक करून जास्तीत जास्त सुरक्षित परतावा कमावण्याचा प्रयत्न करत असतात. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी भरघोस एकरकमी परतावा कमवू शकता. या पॉलिसीचे नाव आहे,’ग्राम सुरक्षा योजना’. चला तर मग जाणून घेऊ या योजनेबद्दल सविस्तर

साधारणपणे, कोणत्याही गुंतवणुकीत थोडीफार जोखीम ही असतेच. मात्र प्रत्येक गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. पोस्ट ऑफीसची ग्राम सुरक्षा योजना असाच एक गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह भरघोस परतावा कमवू शकता. या गुंतवणूक योजनेत तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास भविष्यात 31 ते 35 लाखांचा परतावा सहज कमवू शकता.

योजनेचे पात्रता निकष :
1) पोस्ट ऑफीसच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी लागणारे किमान वय : 19 वर्ष
2) कमाल वयोमर्यादा 55 वर्ष आहे.
3) योजनेत मिळणारी किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल रक्कम 10 लाख रुपये आहे.
4) प्रीमियम भरण्याचा कालावधी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर असेल.
5) या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास गरजेच्या वेळी कर्ज घेण्याची सुविधा मिळते.

रिटर्न कॅल्क्युलेटर :
समजा तुम्ही पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत वयाच्या 19 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली, आणि तुम्ही 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्यावर तुम्हाला 55 वर्षांसाठी 1515 रुपये मासिक प्रिमियम भरावा लागेल. तसेच 58 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर तुम्हाला 1463 रुपये मासिक प्रिमियम भरावा लागेल. 60 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर तुम्हाला 1411 रुपये मासिक प्रिमियम भरावा लागेल. 55 वर्षांच्या मुदतपूर्ती वर पॉलिसी धारकाला 31.60 लाख रुपये परतावा मिळेल. 58 वर्षांनंतर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या पॉलिसीवर 34.60 लाख रुपये परतावा दिला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office Gram Suraksha Yojna investment benefits and return long term on 11 November 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x