23 September 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून जिओ फायनान्शियल शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 500 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार Post Office Interest Rate | पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या 1 ते 30 लाखाच्या बचतीवरवर मिळणारी रक्कम - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 250 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News Patel Engineering Share Price | 60 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL शेअर तेजीत धावणार, यापूर्वी दिला 2139% परतावा - Marathi News Gratuity Calculator | पगारदारांनो, ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्यासाठी 'या' सूत्राचा वापर करा, रक्कम सहज समजेल - Marathi News Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर, श्रीमंत करणार हा पेनी शेअर, कंपनीचा संरक्षण क्षेत्रातही प्रवेश - Marathi News
x

Post Office Interest Rate | पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या 1 ते 30 लाखाच्या बचतीवरवर मिळणारी रक्कम - Marathi News

Highlights:

  • Post Office Interest Rate
  • पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीम :
  • हे कॅल्क्युलेशन पाहून घ्या : Post Office Scheme
  • पोस्टाच्या योजनेची ही माहिती देखील आहे महत्त्वाची :
  • टॅक्स सूट देखील मिळते :
Post Office Interest Rate

Post Office Interest Rate | भविष्यासाठी आणि रिटायरमेंटनंतरच आयुष्य आनंदात जाण्यासाठी अनेक व्यक्ती सरकारच्या किंवा इतर कोणत्याही योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा मार्ग शोधतात. दरम्यान फक्त पैसे गुंतवणेच नाही तर, गुंतवलेला पैशांवर चांगला परतावा जिथे मिळेल तिथे पैसे गुंतवायला अनेकांना फायद्याचे वाटते. कारण की प्रत्येकाने आपले पैसे कायमचे सुरक्षित रहावे असं वाटत असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना पोस्टाची असून तिचं नाव ‘पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम’ असं आहे.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीम :

पोस्टाच्या सिनिअर सिटीजन स्कीमने 1 जानेवारी 2024 ला 8.2% ने व्याज अपडेट केलं होतं. या योजनेमध्ये तुम्ही फक्त हजार रुपये भरून अकाउंट ओपन करू शकता. त्याचबरोबर अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष दिले गेले आहेत. म्हणजेच पाच वर्षानंतर पोस्टाची सिनिअर सिटीजन स्कीम मॅच्युअर होणार.

हे कॅल्क्युलेशन पाहून घ्या :

पोस्टाच्या सिनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये पाच वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडपर्यंत आणि दिलेल्या व्याजदरानुसार तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, तुम्हाला एकूण 1,50,471 रुपये एवढा परतावा मिळेल. जर तुम्ही 2 लाखांची गुंतवणूक करत असाल तर, 3,00,943 रुपये परतावा मिळेल. त्याचबरोबर 5, आणि 10 लाखांच्या गुंतवणुकीवर 7,52,359 आणि 15,40,718 रुपये मिळतील. पुढे 10 लाखांच्या गुंतवणुकी 15,40,718 तर, 20 लाखांच्या गुंतवणुकीवर 30,90,434 आणि 30 लाखांपर्यंत गुंतवणूक केली तर, 45,14,154 रुपये एवढा परतावा मिळेल. जास्त टक्क्याने व्याज दिल्या गेल्यामुळे तुम्हाला व्याजातूनच जास्त पैसे कमवता येतात.

पोस्टाच्या योजनेची ही माहिती देखील आहे महत्त्वाची :

या योजनेमध्ये कोणताही वरिष्ठ नागरिक ज्याचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तो या योजनेत खातं उघडू शकतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी स्वच्छने 60 वय होण्याआधी रिटायरमेंट VRS घेतली असेल अशा 60 पेक्षा कमी आणि 55 पेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती देखील या योजनेचा भाग होऊ शकतात. सीनियर सिटीजन स्कीममध्ये तिमाही आधारावर कॅल्क्युलेशन केले जाते. ज्यामध्ये एप्रिल, जुलै, ऑक्टोंबर आणि जानेवारी आधीच वर्किंग डेला अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाते.

टॅक्स सूट देखील मिळते :

या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे कलम 80C अंतर्गत एका वर्षामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपयांइतकी रक्कम काढून घेऊ शकता. एवढंच नाही तर, या योजनेमध्ये तुम्हाला टॅक्स सूट देखील दिली जाते.

Latest Marathi News | Post Office Interest Rate 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Interest Rate(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x