23 February 2025 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Post Office Investment | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह कमी बचतीत अधिक फायदे मिळतील

post office investment

Post Office Investment | भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नेहमी आकर्षक गुंतवणूक योजना घेऊन येत असते. विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना बँकेतील गुंतवणुकी पेक्षा जास्त फायदा होतो. आपल्या सर्वांना सुरक्षित आणि छोट्या गुंतवणुकीत चांगला परतावा हवा असतो तर त्यासाठी ह्या लेखात आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना बद्दल माहिती देणार आहोत, त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला बँकेपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

सरकारी हमी आणि इतर अनेक सुविधाचा लाभ :
यासोबतच तुम्हाला व्याज परतावा सोबत सरकारी हमी आणि इतर अनेक सुविधाचा लाभ मिळेल. या योजने अंतर्गत व्याजाचा परतावा दर तिमाही मध्ये दिला जातो. या एफडी योजनेत गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे, ह्या योजनेची पूर्ण माहिती इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी जसे 1वर्ष ,2 वर्ष , 3 आणि 5 वर्ष अशा वेगवेगळ्या एफडी कालावधीत गुंतवणूक करू शकता.

मुदत ठेव योजना :
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना अत्यंत सुरक्षित आणि कमी जोखीमची आणि हमी परताव्यासाठी गुंतवणूक करू पाहणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेमध्ये तुम्हाच्या गुंतवणुकीला भारत सरकारची सुरक्षा हमी मिळते. तुम्ही गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत अशी हमी इंडिया पोस्ट आणि भारत सरकार कडून दिली जाते. आपण ह्या मुदत ठेव योजनेत ऑफलाइन किंवा ऑनलाइन गुंतवणूक करू शकता. या योजनेत मध्ये तुम्ही रोख रक्कम, चेक द्वारे, नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग ह्या सर्व माध्यमातून गुंतवणूक करू शकता.

5 वर्षांसाठी मुदत ठेव गुंतवणूक केल्यास :
या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही एकावेळी एकापेक्षा जास्त मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवू शकता. तुम्ही तुमचे सर्व एफडी खाते जॉइंट देखील मिळवू शकता. 5 वर्षांसाठी मुदत ठेव गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयटीआर दाखल करताना कर सवलत दिली जाईल. याशिवाय एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये एफडी ट्रान्सफर करणेही अधिक सुलभ आहे.

मुळात ठेव गुंतवणूक कशी करावी :
पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडने आणि गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे. तुम्ही चेक किंवा रोख रक्कम जमा करून मुदत ठेव बचत खाते उघडू शकता. किमान 1000 रुपये खाते उघडण्यासाठी पुरेसे आहे, तर मुदत ठेवीवर कमाल ठेव मर्यादा नाही.

भरघोस व्याज परतावा :
मुदत ठेव बचत योजनेत तुम्हाला किमान 7 दिवस ते 1 वर्षाच्या गुंतवणुकीवर 5.50 टक्के व्याज परतावा मिळेल. 1 वर्ष ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीत देखील ते 5.50% राहते. तर, 3 वर्षे 1 दिवस ते ते 5 वर्षांच्या गुंतवणुकीत तुम्हाला 6.70 टक्के व्याज परतावा मिळते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post office investment fixed deposit scheme for long term on 22 July 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x